ब्रेकिंग न्यूज :
भारत

शासकीय कार्यालयामध्ये दलाली बंद बगलबच्चे अस्वस्थ - फटांगरे

Blog Image
एकूण दृश्ये: 44

शासकीय कार्यालयामध्ये दलाली बंद बगलबच्चे अस्वस्थ - फटांगरे

     संगमनेर : प्रतिनिधी

नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या बदलीनंतर अवघ्या काही दिवसांमध्येच 2-3 मुख्याधिकारी बदललले आहे या घटनेचे वास्तव तसेच कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता अफवा पसरविण्यात आल्याचे स्पष्ट होतेय, सदरचे निराधार वृत्त यशोधन कार्यालयातून आले आहे हे सांगण्याची कुणालाही गरज वाटत नाही. हे सर्वश्रुत आहे, असा स्पष्ट आणि गंभीर आरोप शिवसेना शिंदे पक्षाचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी केला आहे.

         महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राज्यातील अनेक मुख्य आधिकाऱ्यांना बढती देण्यात आलीआहे, हे वास्तव आहे. तब्बल ६५ मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि आदेशाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार संगमनेर नगरपालिकेचे तात्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची बढतीवर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून दयानंद गोरे यांच्या नियुक्तीची शक्यता आहे. लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे. गोरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्ञात आहेत. पारदर्शक कारभार एक उत्तम प्रशासक म्हणून रूजू होताच नगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि दलालशाहीला निश्चितच लगाम बसेल असा विश्वास फटांगरे यांनी व्यक्त केला. कोकरे गेल्यामुळे काहींचे मनसुबे उधळले असल्याने जळफळाट होत आहे. यापूर्वी संगमनेर नगरपालिकेत टी टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ब्रेक लागला असल्यामुळे त्यांना दुःख झाले आहे अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घरची कामे सांगता येत नाही म्हणून काहीजण चुकीच्या पद्धतीने निराधार व बिनबुडाचे आरोप करत करणे ते साशल माध्यमातून पसरवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. परंतु सर्वसामान्य जनता आता कोणताच थारा देणार नसून पुन्हा एकदा संगमनेर नगरपालिकेवर भगवा फडकणार असल्याचा दावा दिनेश फटांगरे यांनी केला आहे.

आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संगमनेर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहराचा चेहरा मोहराच बदलून टाकणार आहे. विरोधकांनी कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी मयताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांना काय कळणार ? त्यांचे मनसुबे हाणून पाडू तद्वतच त्यांचे अनेक कारनामे लवकरच जनतेसमोर आणले जातील अशी खरमरीत इशाराच फटांगरे यांनी दिला आहे.

      यापूर्वी अधिकाऱ्यांना राजकीय दबावाखाली काम करावे लागत होते, परंतु आमदार अमोल खताळ यांच्या निःपक्षपाती धोरणाने प्रशासकीय अधिकारीच कोणत्याही दबावाशिवाय, निर्भयपणे व पारदर्शकतेने काम करीत आहेत त्यामुळे संगमनेरमध्ये अधिकारी म्हणून कार्य करण्याची इच्छा अनेकांना होत आहे.

----- Advertisements -----

    का बदलले अधिकारी !

दरम्यान, माजी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या विरोधात अनेक तक्रारी शासन स्तरावर प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत शासनाने तात्काळ त्यांची बढती केली. त्यानंतर शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची संगमनेर नगर पालिकेवर प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिर्डी नगर पालिकेत आरक्षण सोडत असल्याने त्यांना दुहेरी जबाबदारी घेणे शक्य नव्हते. अकोले नगरपंचायतीच्या निवडणुका नसल्यामुळे अकोले नगर पंचायतच्या मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याने अधिकारी बदल्यांची चर्चा होत असली तरी यातून बदलीचे खरे कारण स्पष्ट होते हे लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे.

   संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या पदोन्नतीनंतर त्यांच्या जागी अरुण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दरम्यान च्या काळात तहसीलदार धीरज मांजरे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर निवासी नायब तहसीलदार अढारी प्रभारी म्हणून कार्यरत होते. तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या बाबत जनतेच्या अनेक तक्रारी आल्याने त्यांची बदली करून त्यांच्या जागेवर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात रूजू झालेले निष्कलंक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. परंतु काहींना प्रशासकीय यंत्रणेतील कामकाज सहन होत नसल्याने अशा प्रकारचे आरोप करून सर्व सामान्यामध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. जनता त्यांच्या कुठल्याही आरोपांना भीक घालणार नसल्याची जळमळीत टीका फटांगरे यांनी केली आहे

    पूर्वी चालत असे दलालीराज !

पूर्वीच्या काळी तहसील ,प्रांत कार्यालय ,नगरपालिका, पंचायत समिती या सर्व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात दलालीराज सुरू होते परंतु तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर“ नगर पालिकेपासून तहसील कार्यालय, पंचायत समितीपर्यंत सर्वत्र दलालीराज संपुष्टात येत आहे. सरकारी कार्यालयांत सर्व सामान्य जनतेची अडवणूक न होता जलदगतीने कामे होत आहेत. याची शल मनाला बोचत असल्याने विरोधक बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी केली आहे

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम