ब्रेकिंग न्यूज :
भारत

श्रावण मासानिमित्त विचारांची मेजवानी

Blog Image
एकूण दृश्ये: 70

मालपाणी लॉन्स मध्ये वैचारिक श्रावण सरी बरसणार २ ते ४ ऑगस्टला कीर्तन, व्याख्यानांचे आयोजन.                     

{ राजस्थान युवक मंडळाचा अमृत महोत्सव }

       संगमनेर भारत रेघाटे

पवित्र श्रावण मासानिमित्त शनिवारी दि.२ ऑगस्ट पासून राजस्थान युवक मंडळाच्या वतीने तीन दिवसीय धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष मनीष  मालपाणी यांनी दिली आहे. या कार्यक्रमाचा रसिक, मान्यगण, श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मालपाणी यांनी केले आहे. 

 श्रावण महिन्याच्या पावन पर्वकाळाचे औचित्य साधून मागील काही वर्षां पासून सातत्याने राजस्थान युवक मंडळाच्या वतीने तीन दिवसीय उपक्रमाचे आयोजन केले जात असते. बुलडाणा येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन शनिवार २ ऑगस्ट ला सायंकाळी सात वा होईल रविवार ३ ऑगस्ट तसेच सोमवार ४ ऑगस्ट असे सलग दोन दिवस सायंकाळी ७ ते ८ :३० या प्रमाण वेळेत प्रेरक व्याख्याते आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांचे “विषादयोगातून विवेकाकडे : ज्ञानेश्वरी भाव यात्रा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. संगमनेर मालपाणी लॉन्स येथे सदर कार्यक्रम विनामूल्य असून. सर्वांसाठी आसन व्यवस्था केली आहे. कार्यक्रम प्रमाण वेळेतच सुरू होऊन वेळेवर नियोजीत वेळेत होणार असल्याने श्रोत्यांनी वेळेच्या अगोदर दहा मिनिटे उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

  २०२५ हे मंडळाचे अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी अनेक धार्मिक सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष सुमित अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा, सहसचिव कृष्ण असावा, खजिनदार प्रतीक पोफळे, सहखजीनदार, वेणुगोपाल कलंत्री यांनी दिली असून कार्यक्रमाच्या नियोजन यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य कार्यरत आहेत.

----- Advertisements -----

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर