शॉर्टसर्किटने घरे जळाली ; संसारोपयोगी साहित्य, पुस्तके, कागदपत्रासह पैसेही गेले जळून
संगमनेर ; प्रतिनिधी
शॉर्ट सर्किट झाल्याने स्वातंत्र्यचौका मधील एका बोळीत असलेल्या दोन घराचे मोठे नुकसान झाले असून या घटनेत संसारोपयोगी साहित्यासह दोन कपाट, फ्रिज, टीव्ही, शाळकरी मुलांचे दप्तर ,पुस्तके , महत्त्वाची कागदपत्रे तसेच पैसेही जळाल्याने दोन कुटुंबाचा संसार उध्वस्त झाल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सदरची घटना संगमनेर येथील स्वातंत्र्य चौकातील एका बोळीत देविदास राजेंद्र लकारे, सुमीत भगवान लकारे यांच्या घरांना सोमवार ( दि 29) सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन मोठा आवाजही झाला. परंतु हा आवाज नेमका कशाचा आहे. याची शोधाशोध सुरू होताच शेजारच्या घरात आग लागल्याचे जवळच्या नागरिकांच्या लक्षात आले. सुदैवाने एका घरात कोणीच नव्हते तर दुसऱ्या घरातील व्यक्ती घटना समजतात बाहेर पडले त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीच्या भक्षस्थानी एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तब्बल ऐंशी टक्के वस्तू ह्या जळून राख झाल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे घरात पेट घेतल्याने बाजूलाच दिवा सुरू असल्याचे कुटुंबातील एकाने सांगितले. आगीच्या भक्षस्थानी एक एक वस्तू जळत असताना ही आग पसरत गेल्याने फ्रीजच्या गॅसचा ही स्पोर्ट झाल्याने परिसरात स्फोट झाल्याचाही आवाज लोकांनी ऐकला. हा आवाज नेमका कशाचा आहे. हे पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडली.

या आगीच्या भक्षस्थानी दांडपट्ट्या, टीव्ही, फ्रिज, दोन, कपाट, देवघर , विद्यार्थ्यांचे दप्तर, पुस्तके, अती महत्त्वाची कागदपत्रे, त्यामध्ये आधार कार्ड, शाळेचे दाखले, शालेय साहित्य, गाडीचे कागदपत्रे, कपडे, गादी हे पूर्णतः जळून खाक झाले. तर दुसऱ्या घरामध्ये टीव्ही दानपट्ट्या आदि साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती समजतात संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमनाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तर खबरदारी म्हणून बऱ्याच वेळानंतर एम ई सी बी चा कर्मचारी येऊन सदर पुढील अर्थ टाळण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु घटनेनंतरही तब्बल पाच ते सहा उलटून एम ई सी बी चे अधिकारी फिरकले सुद्धा नाही. तलाठी पांडुरंग भुरे, कोतवाल प्रवीण पंधारे यांनी या भागाची पाहणी केली. दोन्ही कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्याने कुटुबाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

घरा बरोबरच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
आग लागलेल्या घरातील मुले हे इयत्ता चौथी आणि सहावीचे विद्यार्थी असून त्यांच्या शाळेच्या बॅगा, पुस्तके हे जळून खाक झाल्याने आता आपल्याला दप्तर पुस्तके कोण देणार ? म्हणून मुले अक्षरश: ओक्साबोक्सी रडत होती.

