श्री साईबाबाच्या दर्शनासाठी निघाली पायी पालखी ; हजारोच्या संख्येने साईभक्ताचे शिर्डीकडे प्रस्थान
संगमनेर भारत रेघाटे
प्रवरा म्हाळुंगी संगमावर स्थित असलेल्या श्रीसाईबाबा मंदिरातून साईबाबांना अभिषेक करत आरती नंतर हजारोच्या संख्येने साई भक्तांच्या पायी पालखीने शिर्डी कडे प्रस्थान केले.
सोमवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता साईबाबाचे दर्शन करत ढोल ताशाच्या गजरात साईबाबांचा जयघोष करत साई भक्तांनी संगमनेर साई मंदिरापासून, रंगार गल्ली, नगरपालिका, मेन रोड मार्गे शिर्डी कडे प्रस्थान केले.
तत्पूर्वी संगमनेर शहरातील माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे साई भक्त, संगमनेर ते शिर्डी पायी पालखी दरम्यान संगमनेरकर सोबतच हजारोंच्या संख्येने साई भक्त या पालखी सोहळ्या सहभागी झाले आहेत.

एक दिवसीय पायी पालखीच्या कार्यक्रमाचे आयोजन साई मंदिर व्यवस्थापक, ओम साई चॅरिटेबल ट्रस्ट तसेच ओम साई ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर साईची पालखी ही सुकेवाडी येथील गणपतीचे दर्शन घेऊन कौठे कमळेश्वर येथील त्यागी बाबा येथे दुपारी साईभक्त महाप्रसादाचा लाभ घेतील. त्यानंतर नांदुर्खी येथे सायंकाळच्या अल्पोपहारा नंतर सात वाजता शिर्डी साईबाबांच्या दर्शन घेवून पालखी परतीचा प्रवास करणार आहे.

