श्री साई चरित्र पारायणाने होणार गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ ; दोनशे पेक्षा जास्त साई भक्त चरित्र पठनात होणार तन्मय ; आकर्षक विद्युत रोषणाई ने सजले मंदिर
संगमनेर भारत रेघाटे
अमृतवाहिनी प्रवरा आणि म्हाळुंगी संगमावर वसलेल्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव प्रारंभ होत असून उद्या सकाळी साडेसहा वाजता अखंड साई चरित्र पारायणात तब्बल 200 पेक्षा जास्त साईभक्त ल्लीन होणार आहेत.

गुरू पौर्णिमा उत्सव 3 जुलै ते 10 जुलैपर्यंत होणार असून 10 जुलैला गुरुपौर्णिमा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पारायण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला श्रीसाई चरित्राणा कृपा प्रसाद देण्यात येणार आहे.
श्री साईचरित्र पारायणाची व्यवस्था श्रीसाई मंदिरात केली आहे. श्रीसाईचरित्र पारायण करणाऱ्या साई भक्तांस श्रीसाईबाबांची छानशी प्रतिमा व एक साईचरित्र बाबांचा प्रसाद म्हणून भेट मिळेल. इच्छुक श्रीसाई भक्तांनी पारायण सोहळ्यात सहभागी होवून साई भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आषाढ शुध्द ८ गुरुवार दि. ०३/७/२०२५ रोजी सकाळी ६ वाजून ३० मि. पासून अखंड श्रीसाईचरित्र पारायण सोहळ्याची सुरुवात होईल. पारायण सोहळा पूर्ण सात दिवस चालणार आहे.

असा असणार गुरूपौर्णिमेचा दिनक्रम
आषाढ शुध्द पौर्णिमा गुरुवार दि. १०/७/२०२४ हा गुस्त्रौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ठिक ५ वां श्री साईबाबांना लघुरुद्रभिषेक होईल.
सकाळी ६ ते ७ पर्यंत श्री साईचरित्र पारायणाचे समाप्तीच्या ५३ व्या अध्यायाचे वाचन होईल.
सकाळी ७ ते ७.३० श्री साईबाबांची आरती होईल.
सकाळी ८ ते ९.३० साई मंदिर ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत संत भेट पालखी सोहळा.
श्रीसाईबाबांनी हातळलेला शेला पालखीत ठेवला जाईल.
सामुदयिक श्रीसत्यनारायण महापूजा होईल. दुपारी ठिक १२ वां. श्रीसाई बाबांची आरती होईल व तद्नंतर महाप्रसाद (भंडारा) होईल.
बुधवार दि ०९/७/२०२५ रोजी सायं. ८ ते १० पर्यंत साईभजन संध्या हा कार्यक्रम होईल. अशी माहिती व्यवस्थापक मंडळ, साई मंदिर, संगमनेर, अध्यक्ष श्री. जसपाल डंग ओम साई चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दिली.

पायी दिंडी सोहळा
एक दिवसीय संगमनेर ते शिर्डी हा एक दिवसीय पायी पालखी सोहळा होणार आहे. या पायी दिंडी चे आयोजन ओम साई ग्रुप संगमनेर यांनी केले आहे. सदर दिंडी साई मंदिर, संगमनेर येथून सोमवार दि. २१ जुलै २०२५ सकाळी ६.३० वा. निघेल.

नगरपालिकेने रस्त्याचे सपाटीकरण करावे
आता साई मंदिर येथे गुरु पोर्णिमा उत्सवाला प्रारंभ झालेला असून नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी खोदकाम करण्यात आले. सदर काम झाल्यानंतर या ठिकाणी काही प्रमाणात खडी टाकून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात आला आहे. परंतु या रस्त्यावर सपाटीकरण करण्यात आलेच नाही तसेच खड्डे पडल्याने या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्या जाते. शाळकरी मुलांना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गुरुपौर्णिमा उत्सव सुरू झाल्याने आता भाविक भक्तांची लगबग या मंदिराकडे होणार असल्याने नगरपालिकेने रस्ता सपाटीकरण करावै अशी मागणी होत आहे.
