ब्रेकिंग न्यूज :
भारत

*शिल्प घडवण्या बरोबरच समाजालाही घडवण्याचे काम तांबट समाज करतो ;- आमदार अमोल खताळ*

Blog Image
एकूण दृश्ये: 194

शिल्प घडवण्या बरोबरच समाजालाही घडवण्याचे काम तांबट समाज करतो ;- आमदार अमोल खताळ                महाराष्ट्र गुजरात कर्नाटकातून आलेल्या मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती ; वधू वर मेळाव्यासह 41 बटूंचा उपनयन संस्कार 

    संगमनेर प्रतिनिधी

महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर विखुरलेल्या समाजाला एकत्रित आणून समाजात समन्वय साधून समाज बांधवांंचा संगम घडवून आणण्याचे मौलिक काम विश्वकर्मा तांबट समाजा करीत आहे. धातू जोडून आकार देत एक साचेबंद आकाराचे शिल्प घडविण्यासह माणसे जोडत समाज जोडण्याचे आणि घडवाण्याचे काम तांबट समाज करीत आहे. समाजाची उपजत कला असून विश्वनिर्मात्याचे समाजास वरदान लाभल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. 

    विश्वकर्मा पांचाळ तांबट समाजाच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याच्या आयोजन प्रसंगी खताळ बोलत होते. यावेळी वधु वर मेळावा तसेच तब्बल 41 बटूंचा उपनयन संस्कार पार पडला. 

        खताळ पुढे म्हणाले की, समाज बांधवांच्या चेहऱ्यावर फुललेले क्षण आणि आनंदाचे क्षण हे दुर्मिळ असतात. समाजाचा मेळावा हा आनंदाचा मेळावा ठरावा हा आपल्यासाठी भाग्याचा क्षण आहे. आपण प्रतिनिधी म्हणून मला आमंत्रित केल्याचा खताळ यांनी आवर्जून उल्लेख केला. विश्वकर्मा तांबट समाज मेळाव्यातील अनुभूती, अनुभव वेगळाच असल्याने माझा आनंद द्विगुणित झाल्याचे ते म्हणाले.

----- Advertisements -----

रंगार गल्ली ,कॅप्टन लक्ष्मी चौकातून जात असतानाच्या लहाणपणीच्या जुन्या आठवणींना खताळांनी उजाळा दिला. या कार्यक्रमास आमदार अमोल खताळ, नीलम खताळ, मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख गिरीश मालपाणी, पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी,,प्रा. बाळासाहेब नगरकर, विष्णुपंत गोमासे, सुनील नाळके, देविदास गोरे, मुकेश म्हाळणकर आदि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात तब्बल 41 बटूंचे उपनयन संस्कार करण्यात आले.

  खताळ पुढे म्हणाले की, हल्ली मुला मुलींच्या विवाहाचा प्रश्न हा बिकट बनत होत आहे. परंतु वधु वर मेळाव्याच्या माध्यमातून समय सूचक अशी संकल्पना राबवून ती सत्यात उतरवण्यासाठी समाज एकजूट दाखवत असल्याचे त्यांनी नमूद केले. एक - मेकांच्या ओळखी बरोबर युवकांचा स्नेहबंध निश्चित वाढत जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समाज बांधवांनी जागा दाखवल्यास आपण निधी उपलब्ध करून सभा मंडपासाठी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी आश्वासित केले. भविष्यात समाजाच्या जागेत कार्यक्रम कराल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

----- Advertisements -----

प्रथितयश उद्योगपती गिरीश मालपाणी म्हणाले की, संघटनेची एकात्मता प्रेरणादायी ठरत असते. सामाजिक कार्य म्हटल्यानंतर आर्थिक तरतूद आणि नियोजन हे महत्त्वपूर्ण असते. वधू वर मेळावा ही काळाची गरज आहे. आपल्या प्रापंचिक गरजेतून आणि व्यस्ततेतून आज कोणालाही उसंत मिळत नसल्याने तसेच मुलींचे प्रमाण कमी झाल्याने ही विषमता वाढल्याने प्रत्येक समाजापुढे मोठी समस्या असून एक आव्हान उभे राहिलेले आहे. योग्य वरास उपवर झालेली वधू अशा मेळाव्याच्या माध्यमातूनच आपणास मिळू शकते. असे सामाजिक भान जपण्याचे काम विश्वकर्मा तांबट समाज करीत आहे. परंपरा लाभलेला हा समाज अनेक गावात आढळून येतो. आपला व्यवसाय सांभाळून अनेक युवक चांगल्या मोठ्या कंपन्यात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक करीत आहेत. स्वतःचा व्यवसाय करत असताना समाजाची भरभराट झाली. कोणत्याही व्यक्तीला कोणती अडचण आली तर सर्वप्रथम समाज मदत करत असतो यांची जाणीव त्यांनी करून दिली. कार्यकर्त्यांनी समन्वय साधल्याने समाज एकत्र आला. हजारोंच्या संख्येने एकत्र जमलेल्या समाजाचा प्रतिसाद हा नजरेसमोर दिसून येत असल्याचे गिरीश मालपाणी म्हणाले.

पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी म्हणाले की, धार्मिक ,सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत त्यात अग्रेसर राहण्याचे काम विश्वकर्मा तांबट समाज करीत आहे. संघटनेत शक्ती आहे संघटनेची शक्ती वाढली पाहिजे. आपले विचार, आपले संस्कृती वाढवली पाहिजे. पुढील पिढीवर संस्कार करण्याचे काम आपण केले पाहिजे. असे भाऊ जाखडी म्हणाले.

प पू महंत श्री भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड आमदार संग्राम भैया जगताप यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाजाचे अध्यक्ष सुनील नाळके यांनी केले 

----- Advertisements -----

प पू महंत श्री भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड आपल्या संदेशात म्हणाले की, समाज मेळाव्यांचे आयोजन केवळ एका समाजाच्या एकतेचे प्रतीक नसून, ते सर्व जाती-धर्मातील वंधुभावाचा पाया घालणारे आणि सुदृढ राष्ट्रनिर्मितीचे एक महत्त्वाचे पाऊल असते, यामध्ये समुदायांतील लोकांच्या मनातील अंतर दूर होते, आपसातील विश्वास वाढतो आणि "सर्वे भवन्तु सुखिनः" या संकल्पनेला बळ मिळते. समाजमेळावे हे एक उत्तम "संस्कारक्षेत्र" असल्याचा अर्थपूर्ण संदेश समाजबांधवांना त्यांनी दिला.

आमदार संग्राम भैया जगताप आपल्या संदेशात म्हणाले की, कला उपासक असलेला समाज हा इतरांना प्रेरणा देणारा आहे. अशा समाज मेळाव्यातून युवकांना प्रेरणा मिळत असते. यातूनच संघटनात्मक बांधणी होत असते या बांधणीतूनच समाज हिताबरोबर देश हिताचेही निर्णय घेतले जातात. असे आमदार संग्राम जगताप यांनी युवकांना प्रेरणा देणारा संदेश दिला.

----- Advertisements -----

 *47 समाज बांधवांना गोरविण्यात आले.*                                      कला, सामाजिक, शैक्षणिक आदि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजाच्या वतीने तब्बल 47 जणांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

पुणे येथील समाजाचे ज्येष्ठ विष्णुपंत गोमासे कार्यक्रमाचा समारोप करताना म्हणाले की, माणूस हा समाजशील प्राणी आहे. सामुदायिक कार्यक्रम बळकटी देणारे असतात. माणूस जन्मताच ऋणी असतो. आई-वडिलांबरोबर समाजाचे ऋण घेऊन तो जगत असतो असे मौलिक प्रबोधन त्यांनी केले.

सौ. गंगा नगरकर यांंच्या अमोघवाणीच्या ईश स्तवन आणि अतिथी स्वागत गीताने दाद मिळवली.

----- Advertisements -----

शिवानी भुसनळे, शीतल भिंगारकर यांनी आपल्या रसाळ वाणीतून  सूत्रसंचलन केले. भगवान विश्वकर्माची आरती आणि पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या राज्यस्तरीय मेळाव्यास गुजरात कर्नाटकासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय मेळावा  यशस्वी करण्यासाठी संगमनेर येथील  विश्वकर्मा पांचाळ तांबट समाजाचे मोलाचे योगदान लाभले. अहिल्यानगर येथील  विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाज बांधवांनी संगमनेर येथील समाज बांधवांचे कौतुक करत त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला. 

आपण जे विचार करतो, ते आपण होतो.

भगवद्गीता
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin