ब्रेकिंग न्यूज :
भारत

शाळा सुरू होण्याआधी पुलाचे काम पूर्ण करा-आ खताळ

Blog Image
एकूण दृश्ये: 169

शाळा सुरू होण्याआधी पुलाचे काम पूर्ण करा-आ खताळ

पालिका प्रशासन ठेकेदारांना दिले निर्देश ; परिसराची ही केली पाहणी

   संगमनेर

गेली चार वर्षांपूर्वी पडलेल्या पुलापासून परिसरातील नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत होते. या समस्या कायमस्वरूपी मात करण्यासाठी शहरातील म्हाळुंगी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित अपूर्ण राहिलेले कामे शाळा सुरू होण्यापूर्वी १० जूनपर्यंत करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी नगरपरिषद प्रशासनासह संबंधित ठेकेदारास आमदार अमोल खताळ यांनी निर्देश दिले आहेत.

शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिरा पर्यंत अंतिम टप्प्यात आलेल्या पुलाच्या कामाची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी केली. त्यावेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे नेते श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास वाकचौरे, शिरीष मुळे, कैलास लोणारी, अविनाश थोरात, दुर्गा धात्रक, माजी नगरसेविका अल्पना तांबे, माजी नगरसेवक लखन घोरपडे दिनेश फटांगरे, कैलास कासार, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाडेकर, विकास डमाळे, दिलीप अनाप, राहुल भोईर, शशांक नामन सह साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

----- Advertisements -----

आमदार अमोल खताळ म्हणाले की, म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळल्यामुळे अनेक वर्षे या परिसरातील विद्यार्थ्यांसह, नागरिक, छोटे मोठे व्यावसायिक यांना मोठा त्रास सहन करावा लागला. याची दखल घेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले असून नगर पालिकेच्या माध्यमातून ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले आहे. काही प्रमाणात अपूर्ण राहिले काम येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

         पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे खताळ यांनी सांगितले. तसेच या कामासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, ठेकेदार कैलास राऊत त्यांचे विशेष कौतुक केले.

----- Advertisements -----

पुलाबरोबर परिसराची केली पाहणी 

माजी नगरसेविका अल्पना तांबे माजी नगरसेवक लखन घोरपडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाडेकर यांनी परिसरातील समस्येकडे आमदाराचे लक्ष वेधले. तुला बरोबरच परिसराची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी केली. दिगंबर गणेश सराफ विद्यालय व ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना तसेच पंपिंगटेशन काशी आई परिसर घोडेकर मळा साईनगर आदि परिसरातील विद्यार्थी छोटे मोठे व्यावसायिक नागरिकांना या पुलामुळे गेल्या काही वर्षापासून त्रास सहन करावा लागला. आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. मागील ३ ते ४ वर्षे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. १६ जूनपासून शाळा सुरू होत असून, नवीन पुलावरून शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येईल,” असे उद्गार आमदार खताळ यांनी काढले. तसेच या भगाची पाहणी करत येथील रस्ते, पाणी, वीज आदि प्रश्ना बाबत आपण गांभीर्याने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

गर्दुलूंचा करा बंदोबस्त खताळ     :- म्हाळुंगी परिसरात गांजा पिणाऱ्या गर्दुल्लूंचा सर्वसामान्य जनता, महिलांना नाहक त्रास होत असल्याचे येथील काही नागरिकांनी आमदार खताळ यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या. या गंभीर बाबींकडे लक्ष वेधत आमदार अमोल खताळ यांनी पोलीस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासनाने गर्दूलूंचा तात्काळ प्रतिबंध करण्याचे आदेश यावेळी प्रशासनाला दिले.

 

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin