ब्रेकिंग न्यूज :
भारत

शंकरभक्त करणार पालखीचे स्वागत

Blog Image
एकूण दृश्ये: 30

शंकरभक्त करणार पालखीचे स्वागत संगमनेरात श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या पालखीचे आज आगमन

    संगमनेर :- प्रतिनिधी

श्रद्धा, भक्ती आणि संतपरंपरेचे प्रतीक असलेली श्री सद्गुरु शंकर महाराजांची पायी पालखी मंगळवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता संगमनेर शहरात रांगोळी, सडासमार्जन आणि जय च्या घोषात आगमन करणार आहे. 

    पुणे धनकवडी येथून प्रारंभ झालेल्या या पवित्र पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होताच वातावरण भक्तिमय होणार आहे. पालखी मिरवणुकीचा मार्ग चंद्रशेखर चौक नेहरू चौक तेलीखुंट मेन रोड नगरपालिका मार्गे लक्ष्मीनारायण मंदिर येथे पालखीचा मुक्काम ठेवण्यात आला आहे. मंदिरात महाआरती व नामस्मरणाचा कार्यक्रमपार पडणार असून त्यानंतर भव्य पटांगणात महाप्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आयोजक मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

    बुधवारी दि. १२ सकाळी पालखीचे सिन्नरकडे प्रस्थान होईल, तर गुरुवारी दि. १३ पालखी नाशिक अंतापूरकडे मार्गस्थ होणार आहे.

----- Advertisements -----

या आगमनानिमित्त शहरात सर्वत्र भक्तिभावाचा उत्सव ओसंडून वाहत आहे. संतश्रींच्या पायी पालखीच्या दर्शनाने श्रद्धा, समर्पण आणि अध्यात्माचा सोहळा अनुभवण्यासाठी संगमनेर सज्ज झाले आहे.

 

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम