शहीद वीर जवान संदीप घोडेकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी ; महायुतीचे पदाधिकारी घेणार मंत्री विखे पाटील आमदार खताळांची भेट
संगमनेर भारत रेघाटे
शहीद सीआरपीएफ वीर जवान संदीप घोडेकर यांनी केलेली देशाची सेवा उल्लेखनीय आहे. संगमनेर शहरासाठी एक प्रेरणास्थान असलेले वीर जवान संदीप घोडेकर या शहीदाचे स्मारक उभे करण्याची मागणी महायुतीचे पदाधिकारी यांनी केली आहे.

वीर जवान संदीप घोडेकर हे संगमनेरचे रहिवासी असून या युवा सैनिकाचे काम अविश्वसनीय व आव्हानात्मक होते. नुकत्याच पहेलगाम येथे झालेला हल्ला यास प्रतिउत्तर देण्यासाठी संदीप घोडेकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

आपल्या देशाचे आणि देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन धोक्यात घालून कमी वयात देशसेवा करत असताना या देशाला आपले आयुष्य समर्थित करणे खरोखरच प्रशंसनीय आहे. आपली जन्मभूमी, कर्मभूमी आणि देशासाठी आपण प्रामाणिक राहून आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी वचनबद्ध असल्याची भावना संदीप सातत्याने बोलून दाखवत असे. संदीप घोडेकर यांचे कार्य संगमनेर वासियांसाठी प्रेरणास्रोत आहे. संदीपचे उदात्त विचार आणि कार्याची दखल शासनाने घेणे गरजेचे असून यासाठी महायुतीच्या वतीने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे , शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी,भाजपा शहराध्यक्षा पायल ताजणे, शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेनेचे अजीत जाधव आदि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. संदीप घोडेकर यांचे स्मारकासाठी सदर पदाधिकारी लवकरच जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
