शहीद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेरात स्मारक व्हावे - काँग्रेसची मागणी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेला निवेदन
संगमनेर भारत रेघाटे
तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यांनी निधन झाले. मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक व्हावे अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक ,राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेद खान पठाण, मुजिक खान, वसीम शेख ,आवेद खान, डॉ. विजय पवार , शेहेबाजअली शेख, अलोक बर्डे ,बादल जेधे, ललित शिंदे ,शरद पावबाके, एकनाथ श्रीपत, सुभाष दिघे, संजय कानवडे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर हे दिल्ली येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा व कर्तव्यपरायनता भविष्यात संगमनेर शहरातील नागरिकांना कायम देशसेवेसाठी प्रेरणा व स्फूर्तीदायी असणार आहे. त्यासाठी त्यांचे संगमनेर येथे स्मारक होणे गरजेचे आहे. तसेच संगमनेर येथील अकोला नाका चौकाला शहीद मेजर संदीप घोडेकर यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

घोडेकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान कायम स्मरणात राहील
- माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेरचे सुपुत्र मेजर संदीप घोडेकर हे देशसेवा बजावत असताना त्यांना मृत्यू आला. सैनिक हा घरदार सोडून देशाच्या सेवेकरता रात्रंदिवस सज्ज असतो. देश सेवा करताना वीरमरण आलेले हुतात्मा मेजर संदीप घोडेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांनी दिलेले देशाकरता बलिदान हे संगमनेर करांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

