शहरात साठला कचरा; पालिकेकडून होत नाही त्याचा निचरा ; मुख्याधिकारी कोकरे यांनी दिल्या कंत्राटदाराला सूचना
संगमनेर भारत रेघाटे
गेली तीन चार दिवसापासून शहरात घंटागाडी फिरत नसल्याने जागोजाग आणि घरासमोर कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणावर साठत चालले असल्याने परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने नागरिकांनी नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. "पालिकेची येत नाही घंटा गाडी, कंत्राटदाराचा काम करत नाही गडी". अशी काहीशी अवस्था पालिकेने दिलेल्या कंत्राटी व्यवस्थेची झाल्याचे दिसून येत आहे.

कचरा उचलणारे कर्मचारी यांना कायम करण्यासाठी शहरातील कचरा उचलणे बंद आहे तर दुसरीकडे "काम आहे बंद , शहरात वाढला दुर्गंध" ऐन सदासुदीच्या काळामध्ये कचरा उचलणाऱ्या खासगी कंपनीचे कर्मचारी त्या कंपनीत कायम होण्यासाठी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने संगमनेर शहरात कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

तसेच गेली काही दिवसा पासून घंटागाडी अनेक ठिकाणचा कचरा उचलत असली तरी काही विघ्न संतोषी नागरिक नवघर गल्लीत रात्री बारा ते तीन चारच्य दरम्यान रस्त्यावर कचरा टाकतात. या कचऱ्यामध्ये मांसाचे तुकडे आणि त्याचे दुर्गंधीयुक्त पाणी कॅरीबॅगमध्ये बांधून रस्त्यावर सातत्याने ठेवले जाते. याबाबत येथील नागरिकांनी पालिका प्रशासनास संपर्क करूनही अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई होण्याची नितांत गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

साईनगर, रंगार गल्ली, बाजारपेठ, नवघर गल्ली, मेन रोड, घोडेकर मळा, साळी वाडा उपासनी गल्ली आदि भागातील नागरिकांनी पालिका व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कंत्राटी कामगारांच्या काही समस्या असल्याने शहरातील कचरा उचलला गेलेला नाही याबाबत आपण कंत्रालदारास यांच्याशी बोलणे झाले आहे. कोकरे म्हणाले की, कंत्राटी कामगारांची ही मनमानी आहे. असले प्रकार आणि मनमानी यापुढे चालणार नाही. सदर कामगार हे कंत्राटी असून त्यांनी याबाबत कंत्राटदार यांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. कंत्राटदार कामगाराकडून असे वर्तन अपेक्षित नाही. याबाबत कंत्राटदार आणि कामगारांनाही आपण सूचना केल्या आहेत. यापुढे असे कोणतेही प्रकार पालिका सहन करणार नसल्याचे कालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले

सफाई कामगारांच्या मागण्या ८ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा ठेकेदार बदला
आ अमोल खताळ यांचे मुख्याधिकार्यांना सक्त निर्देश
शहरातील सफाई कामगारांच्या विविध मागण्या आठ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा सद्य:स्थितीत कार्यरत असणाऱ्या घंटागाडी ठेकेदाराला एकदा समज द्या. जर तो सुधारत नसेल, तर त्याचा ठेका रद्द करा आणि नवीन टेंडर काढून नवीन ठेकेदार नेमा असे सप्त निर्देश आ अमोल खताळ यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले नगरपरिषदेतील सर्व सफाई कामगारांनी आपल्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. ही बाब आमदार.अमोल खताळ यांना समजताच त्यांनी तात्काळ शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे व उपशहरप्रमुख अजित जाधव यांना नगरपालिकेमध्ये पाठवून कामगारांच्या मागण्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर या दोघांनी सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल, असे सांगून तुम्ही कामबंद आंदोलन मागे घ्यावी अशी विनंती केली त्यानुसार सर्व सफाई कामगारांनी आपले बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतले
आमदार अमोल खताळ यांच्या जन संपर्क कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी सफाई कामगारांच्या मागण्या आमदार अमोल खताळ यांच्या समोर वाचून दाखविल्या. त्यानंतर आ.खताळ यांनी मुख्याधिकारी कोकरे यांच्याशी चर्चा करत,आठ दिवसां मध्ये मागण्या पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्व सफाई कामगारांचे जुलै महिन्याचा पगार आज सायंकाळपर्यंत ऑनलाईन जमा केले जाईल. तसेच महिन्यात चार पगारी सुट्ट्या देण्याचे आश्वासनही या बैठकीत देण्यात आले
.
