ब्रेकिंग न्यूज :
भारत

सव्वाशे वर्षांपूर्वीचे काष्टशिल्प ; श्रीकृष्ण जन्माष्टमी, माऊलींचा जन्मोत्सव साजरा;

Blog Image
एकूण दृश्ये: 137

सव्वाशे वर्षांपूर्वीचे काष्टशिल्प ; श्रीकृष्ण जन्माष्टमी, माऊलींचा जन्मोत्सव साजरा; पालखी सोहळ्यासह काष्टशिल्प पाहण्यास भाविकांनी केली गर्दी

   संगमनेर : भारत रेघाटे

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झालीय असून संगमनेर शहरात माऊलीच्या पालखी सोहळ्याने या जन्मोत्सवाच्या शुभारंभ करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाचा जन्माष्टमी सोहळा ही मोठ्या भक्ती भावाने आणि विविध प्रकारचे लाकडी देखाव्याची शुभम मांडणी करून श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि माऊली जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावाने संगमनेर मध्ये साजरा करण्यात आला. माऊलींचा ७५० वर्ष जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असून भाविकांसाठी ही एक वेगळी पर्वणी ठरत आहे. 

       विश्वाला ज्ञान देणारे माऊली यांचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा केला जातो . पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी म्हणाले की यावर्षी सरकारने घेतलेला निर्णय हा अभिमानास्पद असून "हे विश्वची माझे घर" ही ज्ञानेश्वर महाराजांची उक्ती या जन्मोत्सवा निमित्त सार्थ ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या धार्मिक अधिष्ठानाने सर्व भक्तगण एकत्र रहावेत, हा बंधूभाव या जन्मोत्सवा निमित्त दिसून आला जणू हा माऊलींचा कृपाप्रसादच असल्याच्या भावना जाखडी यांनी व्यक्त केल्या.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त संगमनेर शहरात पालखी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ही पालखी शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५.०० वा. श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून पालखी निघाली 

----- Advertisements -----

 *असा होता पालखीचा मार्ग* 

चंद्रशेखर चौक, तांदूळ बाजार, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, नगर पालिका, मेन रोड, चावडी चौकातून, बाजारपेठ, गांधी चौक, तेली खुंट, नेहरू चौक, व संत ज्ञानेश्वर मंदिर येथे आरती प्रसादाने सांगता करण्यात आली. या पालखी मार्गावर भक्त गणांनी सडा, रांगोळी, पुष्पवृष्टी करीत माऊलींच्या प्रतिमेचे औक्षण केले. पालखी मार्गावर विठू माऊलीच्या अभंग वाणीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी ज्ञानेश्वर मंदिराचे ट्रस्टी रमेश सराफ विलास सराफ विश्वजीत सराव प्रसाद सराफ तसेच महानगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे पुरोहित संघाचे संदीप वैद्य, कैलास जोशी, सागर काळे, अरुण कुलकर्णी, पवन काळे, सतीश वैद्य ,विनायक समुद्र, माहेश्वरी महिला सीनियर ग्रुपच्या श्रीमती कलंत्री, गीता परिवाराचे श्री संजय कर्पे, कासार समाजाच्या स्वाती कोळपकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे गणेश बाहेती, प्रभात फेरीचे ज्ञानेश्वर पाथरकर, नीलम खताळ ,ललिता मालपाणी आदि उपस्थित होते.

महिला मंडळ, प्रतिष्ठान, संस्थेने दिला सहयोग* ; मुख्याधिकारी यांनी खेळली फुगडी

    संगमनेर नगरपालिकेने ही ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मोत्सवा त घरी योगदान दिले तसेच पालिकेचे मुख्याधिकारी यांनी पालखी सोहळ्यात फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला एकूणच संगमनेर कर या सोहळ्यात भक्ती भावाने रमून गेल्याचे दिसून आले. श्री ज्ञानेश्वर महाराज देवता ट्रस्ट श्री रामनवमी व हनुमान जयंती उत्सव समिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडी तेली समाज वसंताजी महिला मंडळ सोमवंशी क्षत्रिय समाज महिला मंडळ नामदेव शिंपी समाज खंडोबा गल्ली आम्हा स्वामी समर्थ परिवार राजस्थानी ब्राह्मण समाज जगदीश मंदिर ट्रस्टगीता परिवार संगमनेर कासार समाज महिला मंडळ ब्राह्मण महिला प्रतिष्ठान स्वकुळ साळी समाज पद्मशाळी समाज यांनी या जन्मोत्सव मध्ये सहभाग घेत योगदान दिले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा करण्यात.  

   गोकुळाष्टमी निमित्त ‘आय लव संगमनेर’तर्फे भव्य दहीहंडी उत्सव व वेशभूषा स्पर्धा संपन्न! झाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेरात गोकुळाष्टमी सोहळा शहरात विविध ठिकाणी दहीहंडी व कृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण संगमनेर शहरात गोकुळाष्टमीचा जल्लोष; ‘आय लव संगमनेर’च्या माध्यमातून दहीहंडी व सांस्कृतिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

----- Advertisements -----

सव्वाशे वर्षांपूर्वी तयार केलेले काष्ट शिल्प पाहण्यास संगमनेर करांनी केली गर्दी संगमनेर शहरात एक अलौकिक शिल्पकार म्हणून सुंदर खरे यांचा नामोल्लेख केला जातो. काष्ट शिल्पकलेतील त्यांचे योगदान हे महनीय आहे. त्यांनी अनेक देव देवतांच्या मूर्ती तयार केल्या आहेत.  सव्वाशे वर्षांपूर्वी केलेल्या कास्ट शिल्पाचे गोकुळाष्टमी निमित्त शुभम मांडणी करण्यात आली होती. गेली सव्वाशे वर्षापासून आप्पा  ऊर्फ कृष्णराव खरे यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा पाहण्यास नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रथितयश उद्यमी मालपाणी परिवार, तसेच भाविक भक्तांनी खरे यांच्या घरी देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काष्टशिल्पाची स्तुती करून खरे कुटुंबीयांसोबत असलेला सदरचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. शिल्पकार सुंदर खरे यांच्या अलौकिक अशा कलाकृतीचे त्यांनी भरभरून कौतुक करून भाविकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. खरे कुटुंबीयांसोबत गप्पागोष्टी करत या शिल्पकार बद्दल जाणून घेतले. 

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज