
बहिण भावाचं नाते क्षणाचा राग, क्षणाची भांडणे रुसवा थट्टा मस्करी हे सर्व काही या नात्यांमध्येच दिसून येते. वाहक चालक आपल्या बहिणीपर्यंत पोहोचू शकत नाही. बहिणींना आपल्या भावापर्यंत तर भावाला आपल्या बहिणी पर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे कार्य ते करत असतात. या सर्व बंधु आणि भगिनींना वेळेत आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे काम महिला कंडक्टर तसेच चालक वाहक कर्मचारी करीत असतात. अशा ह्या आपल्या सर्व प्रवाशीसेवकांना "स्वामिनी लिनेस भगिनींनी राज्यपरिवहन महामंडळातील संगमनेर आगारातील कर्मचारी असल्या बहीण भावांना आपलेसे करत एक स्नेहबंध अधिक दृढ करत त्यांनाही हा आशीर्वादाचा धागा सुरक्षिततेची भावना कायम मनात ठेवून बहीण सुद्धा भावाचे रक्षण करते आणि भाऊ सुद्धा या बहिणीचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतो असा संदेश स्वामिनी च्या लाडक्या बहिणींनी

रक्षाबंधना निमित्ताने संगमनेर आगारातील आगार प्रमुख प्रशांत गुंड, सहाय्यक उपयंत्र अभियंता शरद खोत चालक, वाहक, महिला कर्मचारी यांना रक्षासूत्र अर्थातच राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या कर्मचाऱ्यांच्या सेवेला मानवंदना देत त्यांच्याशी बंधुत्वाचे नाते यावेळी महिला भगिनींनी जपल्याच्या भावना व्यक्त केल्या.

आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की या सामाजिक उपक्रमाची प्रसंशा करावी तेवढी कमी आहे. बहिणीमध्ये पाठबळ निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे आमचे कर्मचाऱ्याचे, चालक वाहकांचे मनोधैर्य आणि ताकद वाढली आहे. बहिणी ह्या बसने प्रवास करतात. कारण बसचा प्रवास सुरक्षेचा आणि खात्रीचा असल्याचे आगार प्रमुख गुंड यांनी सांगितले.

संस्थापक अरुणा घोलप यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देताना म्हणाल्या की,लीनेस क्लब हा महिलांचा ऑल इंडिया लेवलला एक सामाजिक कार्य करणारा क्लब आहे. या माध्यमातून महिला सबलीकरण दारिद्र्य रेषेतील गरजू, होतकरू तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न या क्लबच्या मार्फत केला जातो. कारेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेतले आहे. याचबरोबर वृक्षारोपण, अन्नदान आदि विविध उपक्रम या क्लब तर्फे राबवण्यात येतात. या कार्याबद्दल 27 पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भावाचे स्थान देऊन त्यांना एक रक्षा सूत्र बांधले. भावा प्रती आदर व्यक्त करत राखी पौर्णिमा आनंदाने साजरी केली. याप्रसंगी लिनेस क्लब स्वामिनीच्या फाउंडर लिनेस अरुणा घोलप ,क्लबच्या अध्यक्षा सारिका परदेशी, सचिव छाया जाधव, सदस्य निशा सावंत आदिच्या उपस्थितीत रक्षा बंधन पार पडले. ऑल इंडिया लिनेस क्लब या संस्थेच्या महिला सदस्यांनी आगळीवेगळी संकल्पना राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. आगारातील अधिकारी, चालक ,वाहक कर्मचाऱ्यांनी राखी बांधल्या बद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
दरम्यान यावेळी संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड, सहाय्यक उपयंत्र अभियंता शरद खोत कर्मचारी व चालक- वाहक उपस्थित होते. त्यांनीही या अभिनव उपक्रमाचे स्वागत करत महिलांच्या या सन्मानाने सर्वजण भारावून गेले. ऑल इंडिया लिनेस या संघटनेने गावागावात प्रत्येक जिल्ह्यात एक वेगवेगळे नाव दिलेले आहे. रक्षासूत्र बांधून रक्षाबंधन हा नात्याची गुंफण वृद्धिंगत करणारा आणि रक्षा करणारा संदेश देत रक्षाबंधन दिन साजरा केला.
क्लबच्या माध्यमातून महिलांनी आपल्या नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष अरुणा घोलप अध्यक्ष सारिका परदेशी सेक्रेटरी छाया जाधव कोषाध्यक्ष अनिता भोकनळ, डॉ. जया घोलप ,सुषमा कानडे, उषा येखे, निशा सावंत हेमा उंबरे, सीमा काकड, मंगल पोखरकर, सुनीता पावशे, संगीता देशमाने या सर्व महिला विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत असतात
कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.
स्वामी विवेकानंद