ब्रेकिंग न्यूज :
भारत

*सावकारी पाश : कुटुंब हताश, अबब एवढ्या रकमेपोटी एवढी रक्कम 🙄

Blog Image
एकूण दृश्ये: 307

सावकारी पाश : अबब एवढ्या रकमेसाठी एवढी तगडी वसुली !

आठ लाख दिले, उखळले १.२५ कोटी ९७ हजार ; उर्वरीत २१ लाख व्याजा पोटी जीवे मारण्याची कुटुंबास धमकी, नाशिकच्या दोघांना बेड्या 

        संगमनेर: भारत रेघाटे

नाशिक रोड येथील एका सावकाराकडून एका कर्जदाराने २ टक्के व्याजदराने ८ लाख रुपये कर्ज घेतले होते. व्याजाची वेळेवर परत न झाल्याने नाशिक रोड येथील सावकाराने वेळोवेळी व्याज वाढवून सुमारे १.२५ कोटी ९७ हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम वसूल केली. सावकार येथेच थांबला नाही, त्याने संबंधित कर्जदाराच्या घरातून दोन चारचाकी गाड्या ओढून आणल्या तसेच कुटुंबाला जीवे मारण्याची नातेवाईकाचे अपहरण करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरून गेलेल्या संबंधित कर्जदाराने तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना नाशिक येथून अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कंपनीसाठी मनी लॅडरकडून २ टक्के व्याजदराने संगमनेर मधील प्रवीण विलास देशमुख यांनी ८ लाख रुपये घेतले. दरम्यान, मुदतीत मूळ रक्कम आणि व्याज दिले गेले नाही, त्यामुळे मूळ रकमेवर चक्रवाढ व्याज आकारून १.२५ कोटी ९७ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले. तसेच, आलिशान दुचाकी आणि चारचाकी वाहने जबरदस्तीने सावकार घेऊन गेला. उर्वरीत २१ लाख रुपये व्याज म्हणून दिले नाहीत तर कुटुंब आणि नातेवाईकांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.

----- Advertisements -----

मालदाड मधील ज्योती प्रवीण देशमुख यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. महाराष्ट्र मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात तालुका पोलिसांनी नाशिक येथून दोघांना अटक केली. तक्रारदार याने म्हटले आहे की, त्यांचे पती प्रवीण विलास देशमुख यांनी २१ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी कैलाश बाबुराव मैंद (हरिहर, नारायणबापू नगर, जेल रोड नाशिक रोड) यांच्याकडून सावकार परवान्याचा वापर करून कंपनीसाठी दोन टक्के व्याजदराने ८ लाख रुपये घेतले. देशमुख यांनी निर्धारित कालावधीत मुद्दल आणि व्याज न दिल्याने, आरोपी कैलाश बाबुराव मैंद यांनी व्याजासह सुमारे १ कोटी, २५ लाख, ९७ हजार, ५०० रुपये घेतले. आरोपीने स्वतः आणि त्याच्या सहाय्यकांनी व्याजासह १ कोटी, २५ लाख, ९७ हजार, ५०० रुपये घेतले आणि त्यानंतरही न थांबता, तक्रारदार देशमुख आणि साक्षीदारांची टोयोटा कंपनीची ग्लांझा कार एम एच १७ सी एक्स ८४६० आणि ह्युंदाई कार एम एच १७ सी बी ८०५५ ही तक्रारदार देशमुख मालदाड यांच्याकडून जबरदस्तीने व्याज घेतले. आरोपी इथेच थांबला नाही आणि देशमुख यांच्याकडून १ कोटी, २५ लाख, ९७ हजार, ५०० रुपये मागितले. मूळ रकमेच्या बदल्यात त्याने व्याजावर २१ लाख रुपये घेतले. यासाठी त्याने तक्रारदार देशमुख आणि साक्षीदारांना त्यांच्या घरी धमकावले, जीवे मारण्याची धमकी दिली, घरात उपस्थित असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना उचलून नेण्याची धमकी दिली. तसेच देशमुख यांना मानसिक त्रास दिला.

या प्रकरणात, ज्योती प्रवीण देशमुख यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलिसात भा न्या सं च्या कलम ११९, १, ३३३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मनी लाँडरिंग रेग्युलेशन अॅक्ट २०१४ च्या कलम ११९, १, ३०३, ११२, २, ११५, २, ३५२, ३५१ २ सह कलम ३९, ४५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत सहभागी असलेले वाहन जप्त करण्यात आले आहे आणि रवींद्र अशोक सोळसे ३१, जय भवानी रोड, ज्योती नाशिक रोड), भीमचंद्र उर्फ भीम रमेश शिरसाठ ३८, भीमनगर, कामना सोसा चेलाडीसोळ रोड, फ्लॅट क्रमांक २ नाशिक रोड यांना अटक करण्यात आली असून  न्चायालयाने त्यांना ४ जुलै पर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे आणि त्यांचे पथक पोलीस उपनिरीक्षक एस.एस. सातपुते, पोलीस हवालदार महाजन. पो.हे.कॉ ए.के. आरवडे, पो.शि सचिन सोनवणे, पो.हे.कॉ एस.एस. डमाळे, महीला. पोलीस हवालदार सोळसे करीत आहे.

----- Advertisements -----

 

 

 

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम