ब्रेकिंग न्यूज :
भारत

स्वच्छतेसाठी बेजबाबदारांवर केली नगरपालिकेने दंडात्मक कारवाई ;

Blog Image
एकूण दृश्ये: 255

स्वच्छतेसाठी बेजबाबदारांवर केली नगरपालिकेने दंडात्मक कारवाई ; आठ जणांना 4,000 चा दंड ;                             सुंदर व स्वच्छ शहरासाठी सीई़ओ कोकरे यांनी केले आवाहन 

     संगमनेर { भारत रेघाटे }

कोणतेही गाव, शहर असो सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. स्वच्छता अभियान सप्ताहा पुरते शहर स्वच्छ करून सप्ताह साजरा केला जातो का ? पुन्हा शहरातील रस्ते गल्ल्यात ओल्या सुक्या कचऱ्याचे ढीग नाल्या तुंवलेल्या हे चित्र पाहायला मिळते. शहर स्वच्छता जबाबदारी ही आपली नाही ? नगर परिषदेचीच आहे अशाच आविर्भावात अनेक जन वागताना दिसून‌ येतात. प्रत्यक्षदर्शी अशा उपक्रमात नागरिकांनी हिरीरीने भाग घेतला पाहिजे. परंतु आपण नामानिराळे राहतो. शहराची स्वच्छता ठेवणे केवळ नगरपरिषदेचीच जबाबदारी नाही तर येथील प्रत्येक सुज्ञ नागरिकांची आहे.

स्वच्छ अभियानांतर्गत संगमनेर नगरपालिका देशात तिसरा क्रमांक मिळवणारी नगरपालिका असून कचरा मुक्ती मुळे थ्री स्टार मानांकनही नगरपालिकेला मिळालेले आहे. याचे गांभीर्य नागरिकांना नसल्याचे दिसून येत आहे. कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन. परिसरात रोगराईचे साम्राज्य वाढत पसरते. पालिकेच्या माध्यमातून संगमनेर शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी प्राधान्यक्रमाने विचार केला जातो. यासाठी प्रत्येक नागरिकांनीही दक्षता घेतली पाहिजे असे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले.नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने व नागरिकांच्या सहकार्यामुळे संगमनेर शहर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहयोग दाखवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 

जाणीव करून देण्यासाठी पालिकेचे प्रात्यक्षिके

     संगमनेर नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची पथके आता शहरात फिरून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. शहरातील स्वच्छता अभियानापुरतीच न ठेवता नगरपरिषद व सुज्ञ नागरिकाच्या सहकार्याने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवले जावे म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रभागात ओला, सुका, घातक कचऱ्याविषयी प्रात्यक्षिक माहिती देऊन व स्वच्छता जनजागृती मोहीम नियमित राबविण्यात येते. या जनजागृती मोहिमेत प्रत्यक्ष गल्लोगल्लीत जाऊन ओला, सुका व घातक कचरा या विषयी जनजागृती मोहिमेत आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी सहभागी आहेत.

----- Advertisements -----

 महिला वर्गाने दक्षता घ्यावी

विशेषतः महिला वर्गात प्रबोधन करताना आपल्या घरात व परिसरात स्वच्छता कशी ठेवावी, आपल्या घरातील अंगणातील ओल्या, सुक्या व घातक कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे हिरवा, निळा व लाल रंगाच्या डस्टविन मध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून तो कचरा रोज आपल्या दारात येणाऱ्या नपा च्या घंटागाड्यात वेगवेगळा कसा टाकायचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत आहेत. नगरपरिषदेच्या वतीने पथक तयार करण्यात आलेले असून सदर पथकात स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभागाचे अमजद पठाण, राहुल मंडलिक, भाग निरीक्षक मनोज जेधे, दिनेश नवले, प्रवीण ताजने, राजेंद्र म्हस्के, चंद्रकांत ढोले, अनिल घोडेकर, दशरथ कतारी, मनीष कागडे, सुरज सहाणे, हनुमंत मधे, इम्रान शेख, सुधीर दराडे, एजाज शेख, संजय सुरजुसे यांची नेमणूक करण्यात आलेली असून आपल्या घरासमोर किंवा रस्त्यावर कचरा टाकला तर दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. तसेच नगर पालिका आपल्या मालमत्तेवर बोजा देखील टाकू शकते याची जाणीवच सदर टीम नागरिकांना देत आहे. या पथका मार्फत उघड्यावर कचरा टाकलेल्या काही नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच कचरा वर्गीकरण न करताच त्याच्या विल्हेवाट या घंटागाडीत करत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.  

यांच्यावर केली पालिकेने दंडात्मक कारवाई ;

नवनाथ देशमुख, जगजीतसिंह अरोरा, लक्ष्मीनारायण बोराडे, पुरूषोत्त्म दत्तात्रय डेंगळे, हॉटेल श्री. सागर बार, तुकाराम वाडेकर, प्रितम भुसारी, भूषण डेंगळे अशा आठ जणांवर रस्ता कचऱ्यावर टाकणे, तसेच कचऱ्याचे वर्गीकरण न करता घंटागाडीत  कचरा टाकल्या बाबत तब्बल 4,000 चा दंड आकारण्यात आला आहे.

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर