ब्रेकिंग न्यूज :
भारत

संत भेटीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा ; पालखी ठरले विशेष आकर्षण ;

Blog Image
एकूण दृश्ये: 138

संत भेटीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा ; पालखी ठरले विशेष आकर्षण ; तब्बल वीस हजार लोकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

     संगमनेर  { भारत रेघाटे }

प्रवरा म्हाळुंगी संगम तीरावर वसलेल्या श्री साईबाबा मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर , श्री गजानन महाराज मंदिर तसेच परमपूज्य सीताराम बाबा गंगामाई घाट येथे मोठ्या भक्ती भावाने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. श्री साईबाबा मंदिरात सकाळी 4 वाजता लघुरुद्राभिषेक करण्यात येऊन, पारायणकर्त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सकाळी 7 वाजता संत भेट पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी आणि विद्युत सजावट करण्यात आली होती. मिरवणूक वाजत गाजत जात असताना फटाक्यांची अतषबाजी करण्यात आली. यावेळी साईबाबा मंदिर, महालक्ष्मी (कामाख्या) मंदिर, संतोषी माता मंदिर, या दोन्ही ठिकाणच्या देवींना साडी चोळी देण्यात आली. तसेच श्री गजानन महाराज, स्वामी समर्थ मंदिरात संत भेट घेण्यात आली. श्री साईबाबा यांनी हाताळलेला अती दुर्मिळ शेल्याचे पूजन करण्यात आले. सदर शेला लोकमान्य टिळक संगमनेर येथे आले असता खुद्द साईबाबांनी हाताळलेला होता हा शेला पालखीमध्ये भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला. मिरवणुकीमध्ये अबालवृद्ध युवा, महिला पुरूषांनी साईबाबा बोलो आदि गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत साईबाबाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

----- Advertisements -----

सकाळी दहा वाजता सत्यनारायण पूजा करण्यात आली. तब्बल 200 पारायण कर्त्यांच्या हस्ते साईबाबांना दुग्धाभिषेक करण्यात आला. महाआरती होऊन त्यांच्याच हस्ते 200 पारायणकर्त्याना साई प्रतिमा आणि चरित्र भेट देण्यात आले. पौरोहित्य गुरू राहुल कुलकर्णी यांनी केले. त्यांच्यासह पंच ब्राह्मणांनी पूजाविधी पार पाडला. सायंकाळी 56 भोगाचा नैवेद्य साईबाबाला अर्पण करीत भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर बारा हजार भाविक भक्तांनी साई मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे तसेच डॉ. जयश्री थोरात यांनी साईबाबांचे दर्शन घेऊन साई भक्तांना शुभेच्छा दिल्या. 

परमपूज्य सीताराम बाबा ट्रस्ट गंगामाई घाट येथेही तब्बल दहा ते बारा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संत निरंकारी मंडळाने साईबाबा मंदिरात पाण्याची सोय तर गंगामाई घाट येथे भक्तांना भोजन वाढण्यासाठी मोलाची मदत केली. तसेच श्री स्वामी समर्थ मंदिरात अभिषेक, आरती, विविध धार्मिक कार्यक्रमा नंतर स्वामी भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. 

गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला साई भजन संध्या ; रसिक मंत्रमुग्ध 

बुधवारी गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत गायक विकास भालेराव, अरुण सोमानी पापया शिरसुल्ला , वादक राजकुमार सस्कर, भोला सस्कर आदिच्या सुश्राव्य भजनसंध्याने रसिकवर्ग मंत्रमुग्ध झाले.

----- Advertisements -----

गुरु पौर्णिमेच्या नियोजना मध्ये साई मंदिर ट्रस्टी, साई भक्त तमेच संगमनेर नगरपालिका व दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. रात्रीच्या शेजारती नंतर फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली.

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ