ब्रेकिंग न्यूज :
भारत

समाजाशी संवाद साधा : देविदास गोरे

Blog Image
एकूण दृश्ये: 347

समाजाशी संवाद साधा : देविदास गोरे     

         वधू वर परिचय मेळाव्यात नवं युवकांनी पाडली छाप

  संगमनेर प्रतिनिधी 

युवक युवतीने आपल्या भविष्याविषयी चिंतन करत शिक्षणातून आपली प्रगती साध्य केली. याच बरोबर युवकांनी आपले विचार समाज घटकाशी जोडला गेला पाहिजे समाजातील तरुणांनी वरिष्ठांचा आदर्श घेत समाजाशी संवाद साधला पाहिजे असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन विश्वकर्मा समाजातील ज्येष्ठ अनुभवी देविदास गोरे यांनी केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी भगवान विश्वकर्मा आणि ब्रम्हांडनायक गजानन महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

       

   विश्वकर्मा पांचाळ तांबट समाज आयोजित राज्यस्तरीय मेळावा, वधु वर परिचय संवाद प्रसंगी गोरे बोलत होते. गोरे म्हणाले की, समाज एक घर आहे. तरूणांनो तुम्ही व्यक्त व्हायलाच पाहिजे. आपली समाजाप्रती एकसंघता वाढीस लागली पाहिजे. असेही ते म्हणाले . प्रा. बाळासाहेब नगरकर म्हणाले की, योग हे एक सामर्थ्य आहे. योग जुळून आला पाहिजे. वधु वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाज जोडला जातो. या रेशीमगाठीतून समाजाची नवनिर्मिती होत असते. त्यांच्या मध्ये वैचारिकतेची सांगड घालण्याची गरज आहे. आपल्या मेहनतीचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे असेही बाळ नगरकर म्हणाले. अध्यापक श्याम गुंजकर म्हणाले की, युवक युवती आपले संपूर्ण जीवन व्यतीत करत असतात. मोठे होण्यापेक्षा ते सुसंस्कृत झाले पाहिजे. आपल्या समाजातील वरिष्ठांचा आदर्श घेत आपल्या कर्तुत्वाची छाप पाडता आली पाहिजे. आपली ओळख निर्माण करा ! आपली ओळख दाखवा! असे शाम गुंजकर यांनी विचार व्यक्त केले. 

    

 प्रशांत भुसनळे म्हणाले की, वधू वर परिचय मेळाव्या मध्ये युवक आणि युवतीनी धाडस करत माहिती दिली. वधू वर परिचयातून मुले व्यक्त होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमातून ऋणानुबंधाच्या रेशीमगाठी जुळल्या तर कार्यक्रमाचे फलित होईल असा संदेश देत समाज बांधवांना एक भावनिक साद घातली. हा कार्यक्रम उत्साहवर्धक ठरला असून समाज बांधवांच्या चेहऱ्यावरील भाव द्विगुणित झाल्याचे जाणवले. "संगम" हा शब्दच नाते जोडणारा आहे. समाज बांधवांच्या समन्वयातून "संगम" वधू वरांची माहिती लवकरच अद्यावत करणार असल्याचे भुसनळे यांनी सांगितले. विकासामुळे मुले पुढे जातात यातून प्रगल्भ समाजाची निर्मिती होते. युवकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

----- Advertisements -----

 *युवक युवती झाले व्यक्त* 

वधु वर परिचय प्रसंगी आपली माहिती देतांना ऋषिकेश सुखदेव पाथरकर म्हणाला की, सुंदर अशा कार्यक्रमातून समाजाची ओळख होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. प्रियंका नगरकर हिने आपली भावना व्यक्त करताना म्हणाली, समाजातील युवक युवतींना प्रेरणा देणा-या अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे तिने नमूद केले. 

    मेघा आप्रे हिने आपला परिचय करून देतांना आठवणीत राहणारा कार्यक्रम झाल्याचा आवर्जून उल्लेख केला. अनेक युवक युवतीने आपले शिक्षण आणि भवितव्या बद्दलचा पाढा वाचून आपण काय करतो याबाबत माहिती सांगत एक प्रेरणादायी वधु वर मेळावा यावेळी संपन्न झाला. यावेळी अनेक युवक आणि युवतीने वधु वर नामांकन भरलेला फॉर्म समितीकडे सुपूर्द केले. 

अध्यक्ष मुकेश म्हाळणकर यांनी भरगच्च कार्यक्रमात जय विश्वकर्माचा घोष करत अतिथी मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून विश्वकर्मा पांचाळ तांबट समाज कार्यक्रमास दिलेला प्रतिसाद जणू काही कार्यक्रमाची आणि कार्याची पावती मिळाल्याचे सांगत वधू-वर मेळाव्यात सहभागी झालेल्या युवकांना शुभेच्छा दिल्या. 

----- Advertisements -----

 *सूत्रसंचालनातून वाढली रंगत*       

    _____प्रत्येक लाघवी शब्दांची गुंफण करत ज्योती नंदणकर आणि दीपाली नगरकर यांनी जणू ज्योतीचा दीप तेवत राहील अशा सुमधुर शब्दातून अतिथी मान्यगणांच्या स्वागताने रंगत वाढवली, त्यांच्या सूत्रसंचलनास अतिथी बांधवांनी मनमुराद दाद दिली.

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin