ब्रेकिंग न्यूज :
भारत

सीईओ साहिबा, पोलीस बाबा जरा इकडे पण लक्ष द्या ! चार दिवस चार चाकीला प्रतिबंध करा !

Blog Image
एकूण दृश्ये: 131

सीईओ साहिबा, पोलीस बाबा जरा इकडे पण लक्ष द्या ! चार दिवस चार चाकीला प्रतिबंध कराच ! वर्दळ बेशिस्त पार्किंगने नागरिकांना होतोय प्रचंड मनस्ताप 

    संगमनेर ( भारत रेघाटे ) 

बाजारपेठ, मेन रोड, नवीन नगर रोड, बस स्थानका समोरील रस्त्यावरील बेशिस्त वर्दळ आणि शहरातील पार्किंगची समस्याच ही नित्याने हृदयाचे ठोके वाढवणारी ठरत असून जणू काही हृदयच आता हृत्स्फुंद झोके घेत असल्याचे चित्र संगमनेर शहरातील प्रत्येक रस्त्या रस्त्यात दिसून येत आहे. "रस्ते झाले छोटे वाहने झाले मोठे". सिग्नलचा तर बोजवाराच उडाल्याने ही समस्या नागरिकांच्या जिवाशी रोज खेळत असून ढिसाळ नियोजनामुळे बेशिस्त वाहतूक, वाहनात झालेली वाढ पार्किंगची गंभीर समस्या कुचकामी ठरत असल्याने संगमनेरकरांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.

   दिवाळीच्या खरेदीमुळे संपूर्ण बाजारपेठ सर्वत्र गजबजून गेलेली दिसून आली खरी. आता भाऊबीज आणि दिवाळीच्या सुट्या संपताच अलोट गर्दीने पुन्हा बाजारपेठ गजबजून जाणार आहे. अरुंद रस्ते, मोठ मोठ्या चारचाकी वाहनांच्या ताफ्यांने मेनरोड, बाजारपेठेत शिरकाव केल्याने दुचाकी वाहना बरोबर पादचारींना होणारा अतोनात त्रास, त्यातच छोटे, मोठ्या व्यावसायिकांनी रस्ता गिळंकृत करत जणू तो आपल्याच ताब्यात घेतल्याने महिला, लहान मुले, ज्येष्ठांना धापा टाकाव्या लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. एकूणच शहराला सुव्यवस्थितपणाच राहिला नाही. मेन रोड, बाजारपेठ, अशोक चौक, मोमीनपुरा, नवीन नगर परिसरात वाहण्याची नित्याचीच वर्दळ ही डोकेदुखी बनलेली असून अरूंद रस्त्यात हव्या तिथे लावलेल्या दुचाकी, चार चाकीने केलेल्या घुसखोरीने प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी चार दिवस चार चाकीना प्रतिबंध करून, बॅरिगेट लावून, एन्ट्री नो एन्ट्री, वाहतुकीत बदल करत सुरळीपणा आणण्यासाठी पोलीस पहारेकरी नेमामवेत अशी मागणी जोर धरत आहे.

   

  शहरातील बेशिस्त वाहतूक पार्किंगचा अभाव हा संगमनेर शहरातील न सुटणारा प्रश्नच गंभीर बाब बनला आहे. तसेच जागे अभावी पार्किंगची समस्या ही दिवसेंदिवस जटील बनत चालली आहे. यास पर्यायी व्यवस्था म्हणून एन्ट्री, नो एंट्रीसह मार्गामध्ये तात्पुरता बदल करून चारचाकी वाहनांना ठराविक रस्त्यावर प्रतिबंध करण्यात यावा. दरम्यान सी ई ओ साहिबा धनश्री पवार यांनी नवीन रोड, मेन रोड, बाजारपेठ,भारत चौक आदि ठिकाणी पाहणी करून नेमका कोणता संदेश दिला हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. 

----- Advertisements -----

बाजारात जाताय मग थोडं थांबाच! 

संगमनेर शहरातील पार्किंगचा प्रश्न हा जागोजाग नित्याची गंभीर बाब बनलेला दिसून येतो उपाध्यांच्या बोळीत दोन्ही बाजूने लावलेली दुचाकी वाहने, येथील बोळकांडात समोरून येणारे आणि मागून येणारे वाहन जणू काय अंगावर येते की काय ? असा भास होतो. एवढेच नव्हे तर याच भागात मेन रोड तसेच बाजार पेठेतून चावडीकडे जाणाऱ्या चढामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्राने महिला वाहन चालकांची तारांबळ उडत असून त्यांना चांगलीच कसरत करावी लागते. शहरातील चारचाकी, दुचाकी वाहने मात्र जागा दिसेल तिथे आधार घेत वाहने आडवी तिडवी पार्किंग करतांना दिसून येतात अशोक चौक, लालबहादूर शास्त्री चौक, कॅप्टन लक्ष्मी चौकातील मोकळी जागा म्हणजे पार्किग अड्डा बनले की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल बारा ते पंधरा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे.  याबाबत त्यांनी शहर पोलिसात तक्रार  दाखल केलेली आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे  वाहन चालकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने रोजची तू - तू ,में -में, ची कटकट होत असल्याचे चित्र नागरिकांना चांगलाच त्रासदाय ठरत आहे. पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका यंत्रणेचे नियोजनच कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. 

         पार्किंग 

बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागेचा ,चारचाकी वाहने कुठेही अस्ताव्यस्त लावून पादचारी, प्रवाशांना चालणे मुश्कील बनत आहे. शहरातील वर्दळ, पार्किंगचा प्रश्न नित्याचीच डोकेदुखी बनला असून ही समस्या त्वरीत सोडवावी अशी मागणी नागरिकामधून होत आहे. 

चार दिवसाच्या व्यवसायानेच घरात पेटली पणती ! 

पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याचा आडोसा पकडून पथारी टाकत ठाण मांडून बसलेले छोट्या व्यावसायिकांनी रस्तात ठेवलेल्या वस्तूने रस्ता आणि कॉर्नरही व्यापून टाकत तो पूर्णतः अडवण्याचा प्रकार जागोजाग दिसून आला. आम्ही चार दिवस व्यवसाय केला तरच पोटाच्या खळगीसह आमच्याही घरांमध्ये दिवाळीला पणती पेटेल ! अशा भावना येथील पथारी व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.

----- Advertisements -----

शिकत रहा, कारण ज्ञान हेच आपले खरे सामर्थ्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर