सह्याद्रीच्या सहायक सचिवाने घेतली लाच ; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सचिवासह रोखपालास रंगेहाथ पकडले
संगमनेर भारत रेघाटे
शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासाठी वर्ग केलेल्या रकमेच्या बदल्यात तीन लाखा रूपयाची लाच मागितल्या नंतर तडजोडीत दोन लाख देण्याचे ठरले त्यापैकी ५० हजार रुपये शाळेच्या आवारातच स्वीकारताना शाळेचा सहायक सचिवासह रोखपाल या दोघांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सह्याद्री संस्थेच्या आवारात रंगेहाथ पकडल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

घडलेला प्रकार असा आहे की, शाळा सुरु होण्यापूर्वी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. त्यासाठी शासन काही रक्कम संबंधित संस्थेला वर्ग करत असते. ही रक्कम शहरातील एका विद्यालयात वर्गही करण्यात आली. मात्र सहायक सचिव म्हणून काम पाहणारे यांनी ही रक्कम तक्रारदारांला देण्यासाठी किंवा त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी २० टक्क्याप्रमाणे तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील कार्यालयाकडे तक्रार केली. या विभागाने तक्रारीची तात्काळ दखल घेत सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संबंधित शाळेत पथकाने सापळा रचला. तक्रारदाराने केलेल्या चर्चेनुसार असे ठरले, की तीन लाखाची मागणी करण्यात आली होती. दोन लाख रुपये देतो. ५० हजार लगेच देतो आणि दीड लाख नंतर देतो, असे निर्धारित करण्यात आले. त्यानुसार आरोपींनी तक्रारदारा कडून पैसे स्वीकारले त्या क्षणी दोघांना नाशिकच्या पथकाने ताब्यात घेतले. शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास हा प्रकार सह्याद्री संस्थेत घडला.

दोघांची शासकीय विश्रामगृहावर उशिरापर्यंत कसून चौकशी होताच रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक आणि सध्या सहसचिव असलेले बाबुराव राजाराम गवांदे 75 चैतन्य नव प्रेरणा हौसिंग सोसायटी मालदाड रोड, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थे चंद्रभान काशिनाथ मुटकुळे वय 62 राहणार चिकणी त्यांच्या विरोधात अध्यापक अमोल जगन्नाथ दुसाने 32 घुलेवाडी यांनी तक्रार दाखल केली. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम 7 (ए)) व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पवित्र पोर्टल वरून ऑनलाइन प्रक्रिया सरळ सेवा भरती पुणे येथील शिक्षकाला संगमनेर येथील सह्याद्री शाळेत नियुक्ती देण्यात आली होती. शिक्षकाचे पुढील भविष्य सुकर जाण्यासाठी तीन लाख मागितले. तडजोडीत देणार होते दोन लाख ; 50 हजार घेताना पकडले. त्यामध्ये 16 चलनी नोटा व 84 ट्राय करन्सी खेळण्यातील नोटा देताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने या दोघांना रंगेहात पकडले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी भेट दिली. पोलीस एल आर भांगरे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एकनाथ पाटील पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक हे करीत आहेत.
