संगमनेरात विजयादशमीची अनेक दशकांची परंपरा ! उत्स्फूर्त प्रतिसाद सीमोल्लंघन ठरले अनोखे -मनीष मालपाणी
विक्रमी गर्दीत रावण दहन ; रचना मालपाणींच्या संकल्पनेतून हजारो रोपांचे विनामूल्य वाटप !
संगमनेर : प्रतिनिधी
गेली अनेक दशकांपासून विजयादशमी तथा दसऱ्याच्या निमित्ताने शमीवृक्षाचे पूजन तसेच रावण दहनाची अनोखी परंपरा संगमनेर मधील हजारो नागरिकांचे सहकार्य व सहकुटुंब सहपरिवाराचा सहभाग यामुळे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.’ असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी केले.
मालपाणी इंडस्ट्रियल पार्क शिवशक्ती परिसरामध्ये ३१ फूट उंचीच्या रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, हर्षवर्धन मालपाणी, इशिता मालपाणी, आदि उपस्थित होते.
मालपाणी परिवाराच्या स्नुषा इशिता यांच्या हस्ते सायंकाळी 7:30 वा. रावणाच्या दिशेने बाण सोडण्यात आला. क्षणार्धात रावण भस्मसात झाल्याचे अद्भुतसे दृश्य हजारो संगमनेरकरांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ ‘जय श्रीराम ’अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून टाकला. तत्क्षणी लक्षवेधी फटाक्यांची आतषबाजी झाली. अनेकांनी सदरचा प्रसंग आपल्या कॅमेरात टिपले.
धाडसी ऍक्रोबॅट कसरत ठरली खास आकर्षण :- रावण दहनापूर्वी व्यासपीठावर शिर्डी येथील मालपाणी वेट एन जॉय वॉटर पार्क तसेच साई तीर्थ थीम पार्क मधील कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसी पद्धतीचे ऍक्रोबॅट कसरतींचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. संजय मालपाणी यांनीही यावेळी समायोचित भाषण केले. त्यांनी सादर केलेल्या हिंदी कवितेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. स्वागत, सूत्रसंचालन आणि आभार मुरारी देशपांडे यांनी केले. मालपाणी इंडस्ट्रियल पार्कच्या आवारात व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकाविध धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. संगमनेरकरांनी देखाव्यांच आनंद घेतला. प्रभू श्रीराम पंचायतन, महिषासुर मर्दिनी, नवदुर्गा, विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, शंकर पार्वती नंदिकेश्वर अशा विविध देवदेवतांच्या भव्य आणि आखीव रेखीव मूर्तीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. लक्षवेधी बाब म्हणजे अनेक वर्षांपासून मालपाणी फार्मच्या संचालिका रचना मालपाणी तसेच इनरव्हील क्लबच्या सहकारी महिलांच्या वतीने विनामूल्य रोपाचे वाटप करण्यात येते. या माध्यमातून प्रत्येक घराला वृक्षारोपण, वनसंवर्धन आणि पर्यावरण प्रेमाचे महत्त्व विजयादशमीच्या निमित्ताने निसर्गाच्या समृद्धीचा हा वसा घरोघर पोहोचविण्याचा खूप आनंद होत आहे.. आम्हाला याचे खूप समाधान असल्याची भावना मालपाणी यांनी व्यक्त केली.
मालपाणी परिवारातील श्रीमती ललितादेवी, सुवर्णा मालपाणी, संगीता मालपाणी, अनुराधा मालपाणी, सुनीता मालपाणी, शैला पलोड आदी यावेळी उपस्थित होत्या.उद्यमी डॉ. संय मालपाणी, अनुराधा मालपाणी यांच्या हस्ते शमी वृक्षाचे वेदमंत्रांच्या घोषात विधिवत पूजन करण्यात आले. सदरचा सोहळा सुनियोजित रीतीने संपन्न व्हावा यासाठी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

