संगमनेरात फ्लेक्स वार ;राजकारण तापले ; डॉ. विखे, आमदार खताळां नंतर माजी मंत्री थोरातांच्या फ्लेक्सची छेडछाड ; समर्थकांचे वारू उधळतील ? शहरात डॉ विखेंचा, खांडगावात आमदार खताळांचा तर वडगावात थोरातांचा फ्लेक्स फाटला ? कोण आहे शहराचे वातावरण दूषित करू पा्हत आहे. ? निसर्ग तत्व की सामाज घातक तत्व !
संगमनेर { भारत रेघाटे }
श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे, श्रावणात घन निळा बरसला. असे बरसणे आल्हाददायक असते. चोहीकडे बरसणे हे श्रावणाचे वैशिष्ट्ये. तर दुसरीकडे मात्र केलेल्या फ्लेक्स बाजी ऐवजी फ्लेक्स फाडल्याची चर्चा सगळीकडे बरसल्याचे दिसून येत आहे. श्रावणात घन निळा बरसण्या ऐवजी फ्लेक्सवर वार ? बरसत असल्याच्या चर्चेने संगमनेर शहरासह तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. सदरचे फ्लेक्स कोणी फाडले हा प्रश्न अनुत्तरीतच असला तरी शहर पोलीसासह तालुका पोलीसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता या घटनेने समर्थकांचे वारू उधळतील का ? अशीही चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

शहरातील अकोले नाका येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा शनिवार तारीख २६ सकाळी ६ वाजता फ्लेक्स फाटल्याचे आढळून आले. तर खांडगाव मध्ये आमदार अमोल खताळ यांचा अशाच प्रकारचा फ्लेक्स सकाळी ६:३० वाजता फाटल्याचे आढळून आले. तर वडगावात २७ तारखेला रविवारी १२ च्या दरम्यान काँग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फ्लेक्स फाटल्याच्या चर्चेने शहरासह तालुक्यात तर्क विर्तकाला उधान आले.
अकोला नाका येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश असलेला फ्लेक्स शनिवारी सकाळी सहा वाजता फाटल्याचे आढळून आले. या फ्लेक्स वरील डॉ. सुजय विखे यांचा चेहरा फाटल्याचे फ्लेक्स वरून दिसून येते. अशाच प्रकारचा खांडगाव येथे आमदार खताळ यांनी शिवरात्री निमित्ताने भाविकांना शुभेच्छा दिल्याचा फ्लेक्स शनिवारीच सकाळी ६:३० फाटल्याचे आढळून आल्याने या ठिकाणीही आमदार अमोल खताळ यांचाही चेहरा फाटल्याचे फ्लेक्स वरून दिसून येते. तर वडगावात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही फ्लेक्स रविवारी १२ च्या दरम्यान फ्लेक्स वरील चेहऱ्याची बाजू चांगलीच फाटल्याने चर्चेला मात्र चांगलेच तुफान सुटले आहे.
अकोला नाका येथील घटनेची विनोद सूर्यवंशी यांनी फिर्यादी दिली. तर खांडगाव येथील फिर्याद विकास अरगडे यांनी दिली. तर वडगावतील घटनेची फिर्याद बाळासाहेब गायकवाड यांनी अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली. तिन्ही ठिकाणी घडलेल्या घटनेने शहर पोलीस आणि तालुका पोलीसांनी भारतीय न्यायसंहिता 324 (2) प्रमाणे अज्ञाताच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून गैरकृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास संजय बढे करीत आहेत. तर थोरात यांच्या फ्लेक्स बाबत तालुका पोलीस शोध घेत आहे.
जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोल्यासह संगमनेर शहर घुलेवाडीत भेट देत आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासही भेट दिली. परंतु फ्लेक्स बाबत त्यांनी कोणतीच चर्चा अथवा संवाद साधला नसल्याचे दिसून आले.
तर आमदार अमोल खाताळ यांच्या समर्थकांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून एक वेळ फ्लेक्सवरची प्रतिमा फाडाल पण जनतेच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा कशी फाडणार ? असा सवालच खताळ समर्थकांनी केल्याचे दिसून येते.

घटने बाबत थोरात समर्थक म्हणतात की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शांतता, समृद्धी आणि सभ्यतेचे प्रतीक असलेल्या संगमनेरमधील वातावरण गेल्या आठ महिन्यांपासून बिघडले आहे आणि विकृत प्रवृत्ती डोके वर काढत असून काही खोडसाळांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलकाची छेडछाड केल्याने संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी अशा विकृत प्रवृत्तींना वेळीच रोखण्याची मागणी करत तालुका पोलिसात तक्रार दाखल केली आहे. श्रावण महिन्या निमित्त वडगाव पान येथील टोल प्लाझा जवळील महादेव मंदिरात ज्येष्ठ नेते थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांचे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. मात्र, श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी काही विकृत प्रवृत्तींनी दुपारी १२ :३० च्या दरम्यान फ्लेक्सची छेडछाड केली आहे. ही बातमी कळताच संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आणि थोरात तांबे समर्थकांनी तीव्र निषेध नोंदवला. संगमनेरमधील अनेक गावातील अनेक जण यशोधन कार्यालयात पोहोचले. यावेळी इंद्रजित थोरात यांनी सर्वांना शांत केले.. तक्रारीनुसार, कलम ३२४ (४) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत घटनेचा जाहीर निषेध केला. आठ दिवसांपूर्वी कॅप्टन लक्ष्मी चौकाच्या वरील बाजूस नि-हाळी समाजाचे कालिका माता मंदिर आणि माहेश्वरी समाज मंगल कार्यासमोर थोरात यांचा शुभेच्छाचा फ्लेक्स फाडल्याची चर्चाही आता जोर धरत आहे. प्रशासनाने अशा विकृत लोकांना वेळीच थांबवावे आणि कठोर कारवाई करावी. अन्यथा शांत आणि संयमी संगमनेर तालुक्यात अनुचित प्रकार घटला तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असे म्हणणे मांडत, बॅनर फाडून असे कोणाचे अस्तित्व संपत नसते. ही दुष्टप्रवृत्ती निंदनीय आहे त्यांनीही या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त केला.
सदरची घटना नैसर्गिक तत्व असलेल्या वादळ वा-यामुळे की, समाज घातक ठरणा-या तत्वामुळे घडली ? हे ही पाहणे तितकेच खरे ठरेल. एकूणच फ्लेक्स फटल्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांनी या घटनेचा निषेध नोंंदवला आहे.
