ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेरकरांसाठी ज्ञान, संस्कार आणि विचारांचा उत्सव 

Blog Image
एकूण दृश्ये: 54

संगमनेरकरांसाठी ज्ञान, संस्कार आणि विचारांचा उत्सव ; ८ ते १४ नोव्हेंबर वैचारिक मेजवानी कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे आयोजन 

     संगमनेर ( प्रतिनिधी )    

संगमनेरच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या कवी अनंत फंदी यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी तब्बल ४७ वर्षे सातत्याने कवी अनंत फंदी प्रतिष्ठान तर्फे व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे 

    ही व्याख्यानमाला संगमनेर नगर परिषदेचे कवी अनंत फंदी नाट्यगृह येथे रविवार, दि. ८ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर दरम्यान सायंकाळी सात वाजता होणार असून संगमनेरकरांसाठी समृद्ध अनुभव ठरणार आहे.

   महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील नामवंत वक्त्यांची उपस्थिती या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य असून, कला, संस्कृती, प्रशासन, उद्योग, समाजकार्य, पत्रकारिता, न्यायव्यवस्था या सर्व क्षेत्रांतील मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. आयोजकांनी सांगितले की, व्याख्यानमालेसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले असून, सर्वांना सहभागासाठी आमंत्रित केले आहे.

----- Advertisements -----

     या आयोजनाचे अध्यक्ष राजेंद्र भंडारी तर प्रकल्प प्रमुख सुनील चांडक असून, प्रतिष्ठानचे सचिव अरुण ताजणे, खजिनदार पापय्या सिरसुल्ला , सहसचिव स्मिता गुणे, कार्यकारी सदस्य डॉ. ओमप्रकाश सिकची, प्रदीप मालाणी तसेच प्रकल्प समिती सदस्य जसपाल डंग, डॉ. अनिल राठी, सीए नारायण कलंत्री, प्रा.ओंकार बिहाणी, ओमप्रकाश असावा,अँड ज्योती मालपाणी आदींचा सक्रिय सहभाग आहे. 

व्याख्यानमालेचे प्रमुख विषय व वक्ते:

 ८ नोव्हेंबर अशोक राणे : ( सिनेमा पाहायचा असं का ? राणे हे गेली 47 वर्ष राष्ट्रीय पातळीवरील फिल्म सोसायटी चळवळीचे महत्त्वाचे कार्यकर्ते. समीक्षक अभ्यासक संशोधक जागतिक सिनेमाचा इतिहास भारतीय भाषेत सिनेमाची चित्तरकथा अशा पुस्तकाचा स्वरूपात लिहिणारे पहिले इतिहासकार आहेत. 

९ नोव्हेंबर रवी आमले पत्रकार संपादक ( गुप्तचर यंत्रणा ) 

आमले हे गेली तीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत अनेक दैनिकांमध्ये संपादक निवासी संपादक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळाला. आप्पा बळवंत या टोपण नावाने ही त्यांनी लोक रंग मधून लेखन केलेले आहे. 

----- Advertisements -----

 १० नोव्हेंबर इंद्रजीत देशमुख ( पसायदान ) इंद्रजीत देशमुख निवृत्त प्रशासकीय अधिकारी उत्कृष्ट वक्ता गटविकास अधिकारी उपायुक्त , गावासाठी जगणारा माणूस अशी त्यांची ओळख. तसेच 'मनशुध्दीची प्रेरणी करणारे' अशी पुस्तके प्रकाशित आहेत. 

११ नोव्हेंबर शिवप्रसाद जाजू उद्योगपती (समय आणि संघटन ) शिवप्रसाद जाजू : पावर ग्रुप ऑफ इंडस्ट इंडस्ट्रीजचे सीईओ कंपनीच्या प्रोडक्शन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि टेक्निकल मार्केटिंग या क्षेत्रात भरीव योगदान ,अनेक नामांकित कंपन्या तसेच संस्थांवर प्रभावी कामगिरी. 

१२ नोव्हेंबर सुप्रिया राज सोशल वर्कर, लेखिका ( काश्मीरीयत एक जिवंत अनुभव ) सुप्रिया राज यांनी काश्मीरमधील लाईन ऑफ कंट्रोल वर एकटीने प्रवास करणाऱ्या एक धाडसी महिला संगणक शास्त्रात शिक्षण घेऊनही आयटी क्षेत्रात काम न करता, एक वेगळ्या क्षेत्राचे वलय त्यांनी निवडले आहे. 

१३ नोव्हेंबर मुक्ता चैतन्य सायबर पत्रकार प्रशिक्षक ( आधुनिक जगण्याची डिजिटल आव्हाने) मुक्ता चैतन्य सायबर पत्रकार प्रशिक्षक सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता क्षेत्रातील मुक्त पत्रकार प्रशिक्षक संशोधक मराठीतील सायबर क्षेत्रातील पहिल्या पत्रकार

 १४ नोव्हेंबर मृदुला भाटकर माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई, ( आम्ही धार्मिक आहोत.) मृदुला भाटकर ह्या माजी न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई. पुणे कोर्टात वकिली, मुंबई कोल्हापूर या ठिकाणी न्यायाधीश, वृत्तपत्रातूनही विपुल लेखन कविता केल्या. त्यांचा कोर्टातल्या व मनातल्या हा कवितासंग्रह चांगलाच गाजला आहे.  

----- Advertisements -----

           या व्याख्यानमालेद्वारे विचारांचे नवे क्षितिज खुले होणार असून, संगमनेरकरांना दरवर्षीप्रमाणे यंदाही एक सार्थ वैचारिक पर्व अनुभवायला मिळणार आहे.

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी