पळवलेली रेल्वे आणण्यासाठी संगमनेरकर एकवटले
संगमनेर ( प्रतिनिधी )
संगमनेरकरांना पळवलेली रेल्वे परत मिळवून देण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी दिला. रेल्वे ही एखाद्या व्यक्तीची नाही, तर विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि सर्व सामान्यांसाठी आहे. सरकारने आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
संगमनेर शहरातील व्यापारी असोसिएशन सभागृहात गुरूवारी झालेल्या बैठकीत पुणे नाशिक महामार्ग बंद करण्याची चेतावणी देत, या रस्त्यावर आमदार, खासदार, मंत्र्यांची गाडी जाऊ देणार नाही असा गर्भित इशारा आमदार तांबे यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की आपल्या अंगावर आंदोलनातील अनेक केसेस आहेत आणि तेच राजकारण्यांचे मेडल असल्याचे ते म्हणाले. रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी आता मागे हटायचे नाही, असे स्पष्ट करत ई- मेल, सह्यायाची मोहीम ओनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. शाळा, कॉलेज, कारखाने, दुकाने याठिकाणी जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. अधिवेशनानंतर मोठ्या प्रमाणावर संगमनेर नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचेही तांबे यांनी सांगितले. तसेच सिन्नर, हिवरगाव पावसा आणि आळेफाटा येथील तीनही टोल एकाच वेळी बंद करण्याचा इशाराच त्यंनी दिला. संगमनेरचा रेल्वे विषय हा राष्ट्रीय विषय केल्याशिवाय न्याय मिळणार नाही असे आवाहन करत तांबे यांनी शहरातील प्रत्येक नागरिक, व्यापारी व सर्व घटकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे सांगितले. स्थानिक आमदार अमोल खाताळ यांनाही आम़त्रित करून या आंदोलनात साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. संगमनेर नाशिक पुणे रेल्वे महामार्ग हा संगमनेर वरून जावा यासाठी संगमनेरकरांनी एकजुट मोठा पाठिंबा दिला असून यासाठी कृती समिती ही स्थापना करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
-संगमनेर शहर मुंबई नाशिक पुणे सुवर्ण त्रिकोणात येते. लोकनेते बाळासाहेब थोरात हे नाशिक पुणे रेल्वेसाठी सतत प्रयत्न करत आहेत. तथापि, राजकीय फायद्यासाठी नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलण्यात आला आहे आणि कोणतेही तांत्रिक कारण न देता संगमनेर, जुन्नर आणि नारायणगाव मार्गे रेल्वे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलआंदोलन सुरू केले जाईल. नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे धावावा अशी मागणी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.
अज्ञात