ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेर शहरात वाहतूक वादातून पोलीसांवर हल्ला!

Blog Image
एकूण दृश्ये: 82

संगमनेर शहरात वाहतूक वादातून पोलीसांवर हल्ला ! पोलीस निरीक्षकांसमोर मोठे आव्हान बेशिस्त नागरिकांचा अरेरावीचा कळस; 

    संगमनेर प्रतिनिधी

संगमनेर शहरातील वाढती वाहतूक आणि अव्यवस्थित पार्किंग ही स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची नित्याचीच डोकेदुखी ठरत आहे. या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना समज देत शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच, काही तरुणांनी अरेरावीची भाषा करत पोलिसांवरच हात उचलण्याचा प्रकार घडला आहे. या गोंधळात काही महिलांचाही सहभाग असल्याचे समोर आले असून, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, प्रशासकीय कामात गुंतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे ही गंभीर बाब असून, वाहतूक नियम तोडणाऱ्यांचा दादागिरीचा प्रकार शहराच्या संस्कृतीला काळिमा फासणारा ठरत आहे.

दरम्यान, नुकतेच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर म्हणून रुजू झालेले यांच्यासमोर हे पहिलेच मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

----- Advertisements -----

त्यांनी कालच शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त प्रस्थापित करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच घडलेला हा प्रसंग म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीची कसोटी ठरणार आहे. संबंधित घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक बारावकर यांनी सांगितले. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचा काय विश्वास राहील ? असा सवाल उपस्थित केला आहे.

वाहतूकीचा बेशिस्तपणा यावर पोलीस प्रशासनाकडून तातडीने कारवाईसह कठोर उपाययोजना होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin