नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. कोल्हेवाडी रोडवरील गटारात काम करत असताना दोन कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याने. शहरात खळबळ उडाली आहे. ठेकेदरावर कामकाजात सुरक्षेतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अतुल रतन पवार ( वय 19 ) तर दुसरा रियाज पिंजारी { वय 22 } या दुर्घटनेमध्ये दोघे मृत झाले अशी अधिकृत माहिती कुटे हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप कुटे यांनी दिली. सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदना साठी पाठवण्यात आले असून तिसरा कर्मचारी मेजर प्रकाश वसंत कोटकर यांनी धाडस करत हिंमत दाखवली परंतु प्रयत्न विफल ठरला ते ही या घटनेत जखमीं झाले आहेत.
मयत: अतुल रतन पवार वय १९ वडार वस्ती संगमनेर

मयत : रियाज पिंजारी वय वर्ष २२ मदिना नगर वरील 
वरील दोन युवक ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत पावले आहेत. संगमनेर नगरपालिकेने हाती घेतलेल्या सांडपाणी व्यवस्थापन एसटीपी प्रकल्पांतर्गत शहरात भूमिगत गटाराचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. आज गुरूवार दि. १० जुलै २५ कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान कर्मचाऱ्याला गटारात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना वाचण्यासाठी स्थानिक नागरिक मदतीला धावले. परंतु गटारात श्वास कोंडला गेला यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला . घटनेची माहिती मिळताच शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्यही सुरू करण्यात आले .गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने डॉ प्रदीप कुटे रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर डॉ. सुधीर तांबे, डॉ जयश्री थोरात यांनी रूग्णालयात धाव घेत विचारपूस केली तसेच जखमीची तपासणी केली. डॉक्टर कुठे यांना चांगले उपचार देण्याचे निर्देश दिले तसेच जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला.

शिवसेना गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, नगरसेवक किशोर पवार निखिल पापडेजा, एड, संग्राम जोंधळे एड, श्रीराम गणपुले, राहुल भोईर ,दिनेश फटांगरे, आदि पदाधिकाऱ्यांसह तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 
घटनेचे गांभीर्य घेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी यासंदर्भात घटनेचे अतिव दुःख होत असून घटनेचे समर्थन करू शकत नाही. या गटारीत उतरण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे असते. परंतु ठेकेदाराकडून याबाबत कुठलेही गाईडलाईन, मार्गदर्शन केलेले दिसून येत नाही. या संदर्भात पालिकेकडून मुस्ताक शेख या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहर पोलिसाची संपर्क साधून आहोत. सुरक्षेची उपायोजना केल्याशिवाय असे कामे करू नयेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येत असून आर्थिक मदती संदर्भात ठेकेदारास सूचना करण्यात येत असल्याचेही मुख्याधिकारी यांनी सांगितले.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करा ; आ खताळ यांचे निर्देश ; कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटारीचे काम सुरू असताना दोन कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अतुल रतन पवार ,रियाज पिंजारी या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही असून कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. शासन स्तरावर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खताळ म्हणाले. तसेच या घटनेप्रकरणी दोषी असलेला ठेकेदार मुश्ताक शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सदरची घटना आज दि १० जुलै २५ ला दुपारी दोन च्या सुमारास घडली असून यावेळी संगमनेर शहरातील विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात घेराव घालत आरोपीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.
अज्ञात