ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेर मध्ये अवैध मुरूमाची चोरी : हायवासह चालक ताब्यात ;

Blog Image
एकूण दृश्ये: 248

संगमनेर मध्ये अवैध मुरूमाची चोरी : हायवासह चालक ताब्यात; 

   संगमनेर भारत रेघाटे

महसूल विभागाच्या डोळ्यात धुळ फेकत तालुक्यात बेकायदेशीर खाणकाम सुरूच असून अनेक ठिकाणी जेसीबीचा मोठ्या प्रमाणात वापर करून उत्खनन केले जात आहे. अनेकदा अशा घटना घडतात, ज्यामुळे महसूल विभागाला कारवाई करूनही तथापि, बेकायदेशीर खाणकाम काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

      बेकायदेशीर खाणकामामुळे भूक्खलनाचा दुष्परिणाम दिसून येत असला तरी महसूल विभाग या घटनेकडे दुर्लक्ष करते की काय ? असाही प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला जात आहे. नाशिक पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या मुरुम खनन करून नेत असल्याची माहिती खबरी मार्फत महसूल विभागला समजतात महसूल विभाग खडबडून जागा झाला. तात्काळ संगमनेरचे तलाठी पांडुरंग भुरे तसेच गुंजाळवाडी चे प्रवीण ढोले यांनी या अवैद्य रित्या मुरून चोरीला जात असल्याचे समजताच् हायवा एम एच 19 सी वाय 3529 सह चालकाला ताब्यात घेतले. सदरची घटना गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडली.

हायवा चे मालक मनोहर सातपुते यांनी परवानगी शिवाय मुरूम उत्खनन केले: रस्त्याच्या कडेला असलेल्या 5 ब्रास बेकायदेशीरपणे मुरूम दिवसाढवळ्या चोरी होत असल्याचे महसूल विभाग काय करतो ? संगमनेर मध्ये मुरूम आणि रेतीचा दिवसाढवळ्या डंपरने अवैद्य वाहतूक केल्या जात असून अनेक वेळा विना नंबर असलेले वाहने आढळून येतात. महसूल विभागाने आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पुणे नाशिक महामार्गावरील बायपास जवळ ही कारवाई करून डंपर्स आणि ड्रायव्हरला ताब्यात घेत हवा हा पोलीस लाईन येथे जमा करण्यात आला.

----- Advertisements -----

सदर व्यक्तीला नोटीस काढून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले. सदरची कारवाई तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे तलाठी पांडुरंग भुरे तसेच गुंजाळवाडी चे तलाठी प्रवीण ढोले यांनी कार्यवाही करत डंपरसह चालक ताब्यात घेतला आहे.

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin