ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेर महाविद्यालय पत्रकारितेचा निकाल 95.54 %

Blog Image
एकूण दृश्ये: 32

संगमनेर महाविद्यालयाचा पत्रकारितेचा निकाल 95.54 % 

शेळके प्रथम, नवले व सोनवणे द्वितीय, देशमुख तृतीय 

      संगमनेर :भारत रेघाटे

पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमा्चा 2024 25 या शैक्षणिक वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयाचा 95.54 % प्रतिशत निकाल लागला. यामध्ये चंचल शेळके हिने 74.85 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रा. नितीन नवले आणि हर्षल सोनवणे यांनी प्रत्येकी 73.85 टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्रा.मच्छिंद्र देशमुख यांनी 71.71 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. जयश्री पाटील व वैशाली घाडगे यांनी अनुक्रमे चौथा तर अरुण मोकळ व वृषाली भोसले यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली.

.          मागील 14 वर्षांपासून संगमनेर महाविद्यालयात पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. विविध प्रात्यक्षिके, सराव सत्र व इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे अहिल्यानगर बरोबरच नाशिक, पुणे, संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी संगमनेर महाविद्यालयात प्रवेश घेतात. गृहिणी तसेच नोकरी- व्यवसाय करून पत्रकारिता किवा लेखन कौशल्य शिकू इच्छिणाऱ्यांसाठी प्रत्येक रविवारी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत संगमनेर महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. मुद्रित माध्यमां बरोबरच दूरचित्रवाणी, नभोवाणी तसेच शासनाच्या विविध विभागात विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरीच्या संधी या अभ्यासक्रमा द्वारे उपलब्ध होऊ शकतात. पत्रकारिते बरोबरच मराठी भाषेचे विविध पैलू अधिक चांगल्या पद्धतीने शिकू इच्छिणाऱ्या शिक्षकांचाही या अभ्यासक्रमाला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो. 

शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सी ए नारायण कलंत्री , खजिनदार राजकुमार गांधी, व्यवस्थापनातील सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य रवींद्र तासिलदार, डॉ. प्रविण त्र्यंबके, अभ्यासक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. संतोष खेडलेकर, अभ्यासक्रम समन्वयक विजय पाटील यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. इच्छुकांनी समन्वयक विजय पाटील 9822020504 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी म्हणाले की,हा अभ्यासक्रम म्हणजे केवळ पत्रकारितेची तांत्रिक माहिती देणारा कोर्स नाही. पत्रकारिता अभ्यासक्रमात पहिल्या पाच क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या आठ विद्यार्थ्यांमध्ये सहा शिक्षक आहेत विद्यार्थ्यांमध्ये डॉ. जी.पी.शेख (वय 78) व सतीश घबाडे (वय 74) यांचा समावेश आहे. यावर्षी पत्रकारिता अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्यांपैकी दोन विद्यार्थी वगळता कोणीही पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत नाही. परंतु लेखन कौशल्य विकसित व्हावे, मराठी भाषेचे विविध पैलू बारकाईने समजावे व यातून सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीचे कौशल्य अधिक विकसित व्हावे यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

----- Advertisements -----

डॉ. जी. पी. शेख म्हणाले की, मी आता 78 वर्षांचा आहे. आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर असताना पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात नव्याने काही करत पत्रकारितेसारखा विषय शिकताना एक वेगळाच अनुभव होता. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. तर पत्रकार चौथा स्तंभ आहे. माणसाने शिक्षण अविरतपणे घेतले पाहिजे त्यास वयाचे बंधन नाही असे ते म्हणाले  नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रात बदल होत असून पत्रकारितेत होणारे बदलही अनुभवता आले असे शेख म्हणाले.

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी