संगमनेर बस स्थानकाचे झाले सर्वेक्षण; उपमहाव्यस्थापक या़ंनी दिली भेट
संगमनेर { भारत रेघाटे }
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रात बसस्थानक आणि आगाराचे सर्वेक्षण सुरू असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत संगमनेर बस स्थानकाचे मंगळवार दिनांक 29 रोजी दुसरे सर्वेक्षण पार पडले.

प्रादेशिक मूल्यांकन समिती क्रमांक-03 नागपूर विभागाचे उप -महा व्यस्थापक श्रीकांत गभणे , प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी किशोर आदमाने यांच्या समितीने सदरचे सर्वेक्षण केले आहे. यावर्षीही तीन सर्वेक्षण होणार असून तिसरे सर्वेक्षण ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात प्रथम येणाऱ्या आगारास एक कोटीचे बक्षीस देण्यात येते. बक्षीस वितरणाचा निर्णय राज्य परिवहन मंत्री एकनाथ शिंदे याबाबत सर्वेक्षणानंतर निर्णय घेणार आहेत संगमनेर आगाराच्या सर्वेक्षणामध्ये बाग बगीचा, बस स्थानक स्वच्छता, सुलभ शौचालय, तसेच चालक वाहक कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष आदि भागाची पाहणी करून सर्वेक्षण केल्या गेले आहे.

संगमनेर आगारात कर्मचाऱ्यांच्या सहभागातून बाग बगीचा निर्माण करून त्यांची देखरेख आणि मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या योगदान आणि सहभागातून केला जातो. या सर्वेक्षणा मध्ये राज्य, प्रादेशिक आणि जिल्हा असे तीन सर्वेक्षण केले जातात. मागच्या सर्वेक्षणात संगमनेर लोणी आगाराने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून प्रादेशिक आणि राज्यांमध्ये दुसरा क्रमांकही संगमनेर आगारानेच प्राप्त केला होता. त्यामध्ये 100 पैकी 79 गुणांक मिळविले होते. संगमनेर आगारास पाच लाख तर लोणी आगारात अडीच लाखाचे बक्षीस मिळाले होते. संगमनेर बस स्थानका हे सातत्याने नागरिक आणि प्रशासनाच्या नजरेत भरणारे असल्याची प्रशंसा उपमहाव्यस्थापक श्रीकांत गभणे यांनी केली आहे.
