ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेर बस आगार बनले चोरांचा बाजार ;

Blog Image
एकूण दृश्ये: 331

संगमनेर बस आगार बनले चोरांचा बाजार ; चोरीला जाते गंठण तर कधी जाते मोहन माळ; आगाराची व्यवस्था ठणठण गोपाळ 

     संगमनेर ( प्रतिनिधी )

शहरात मोठ्या दिमाखाने हायटेक म्हणून तोऱ्यात उभे राहिलेले बस स्थानकच नित्याचीच डोके दुखीची बाब बनले असून बस स्थानक आगार हेच समस्याचे आगार बनल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होत असल्याने हल्ली गाड्यांना बऱ्यापैकी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत व पाळत ठेवून चोरटे प्रवाशांच्या गळ्यातील दागिना, पाकिट मार, मोबाईल आणि बॅगेतील पैसे, सोन्याच्या वस्तू आदिसह त्यावर डल्ला मारताना दिसून येत आहे. अशाच एका प्रकारला कोपरगाव येथील श्वेता मयूर कोल्हे वय वर्ष 25 देर्डे कोराळे येथील एका महिलेला कोपरगाव बस मध्ये चढत असताना एका अज्ञात महिलेंने त्यांच्या बागेतील दहा ते अकरा ग्रॅम वजनाचे गंठण लंपास केल्याच्य घटननेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही घटना मंगळवार दिनांक ५ ला दुपारी २:१५ च्या सुमारास संगमनेर बस स्थानक परिसरात घडली. याबाबत श्वेता मयूर कोल्हे यांनी ६ ऑगस्टला दुपारी अज्ञात महिलेच्या विरोधात फिर्याद दिली. फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि पोलीस कर्मचारी लोखंडे यांनी बस स्थानक परिसराची पाहणी केली सदर घटनेचा तपास शहर पोलीस गवळी करीत आहे 

इन कॅमेऱ्याच्य कक्षेत असलेले बस स्थानक आता कॅमेरा केव्हा सुरू होईल या प्रतीक्षेत आहे. एकूणच कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचेही चांगले फावत आहे. याबाबत आगार व्यवस्थापका कडून सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहारही केला जातो. परंतु त्या पत्राला पोलीस प्रशासनाकडून केराची टोपली दाखवल्याने बस स्थानक परिसरात अनेक समस्यांचा कचराच वाढत चालल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी संगमनेर बस स्थानकाचे सर्वेक्षणही करण्यात आले. या ठिकाणी पाकीट मार, मोबाईल चोर, गंठण, कधी अपघात तर कधी भिकाऱ्यांचा सुळसुळाट स्वच्छतेचा अभाव यामुळे संगमनेर बस स्थानक आता नियमित समस्येच्या गर्तेत अडकल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

----- Advertisements -----

या घटनेने बस स्थानकात चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे एक ताजे उदाहरण यातून दिसून येत आहे. आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात की चोरांच्या नजरेत आहात ? असा काहीसा प्रश्न आता प्रवाशांनाही पडू लागला आहे.  

 

 

 

----- Advertisements -----

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज