ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेर भूषण पुरस्काराने गनी हाजी शेख सन्मानित

Blog Image
एकूण दृश्ये: 176

संगमनेर भूषण पुरस्काराने गनी हाजी शेख सन्मानित 

      संगमनेर: भारत रेघाटे

अँग्लो उर्दू ज्युनियर कॉलेजमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त शेख एजाज शमसुद्दीन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. हैदर वजीर बेग होते. शाळेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक गनी हाजी शेख यांच्या पुनर्नियुक्तीमुळे तसेच त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना ट्रस्टतर्फे "संगमनेर भूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी  नगर पालिकेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे, अमरावती येथील न्यायाधीश असगर हैदर बेग सह स्थानिक रहिवासी आणि उपस्थित होते. विविध महाविद्यालयां मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेचे मुख्य विश्वस्त अब्दुल्ला चौधरी यांनी सविस्तर भाषण केले. आणि १९६२ च्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जावेद उमर सय्यद, नूर मोहम्मद शेख, इशाक खान, जवाहरलाल उर्दू केंद्राचे  ईदरीस शेख विश्वस्त अब्दुल्ला चौधरी, सय्यद आसिफ अली,, शहरातील विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. संस्थेचे सचिव शौकत खान पठाण यांनी आभार व्यक्त केले.

----- Advertisements -----

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम