ब्रेकिंग न्यूज :
भारत

साडेसात लाख थकित कर त्वरीत भरा अन्यथा .

Blog Image
एकूण दृश्ये: 127

साडेसात लाख थकित कर त्वरीत भरा अन्यथा ..टोल करणार सील ; हिवरगाव ग्रामस्थांचा इशारा

    संगमनेर :भारत रेघाटे

टोल प्लाझा कंपनीकडून अनेक वर्षांचा मालमत्ता कर थकित असल्यामुळे टोल प्लाझाच सील करण्याचा ठराव हिवरगाव पावसा येतील विशेष ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.

      या बाबत टोल कंपनीस वारंवार पत्रव्यवहार व प्रशासकीयस्तरावर पाठपुरावा करूनही संबंधित कंपनीने थकीत कर अद्याप भरलाच नाही. सदर थकीत कराची रक्कम रुपये ७,४८,४९० एवढी असून २०१३ पासून कंपनीने भरणा केलाच नाही. टोल प्लाझाच्या इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात हिवरगाव पावसा येथील जागा हस्तांतरित करण्यात आली. परंतु उभ्या असलेल्या बांधकाम मालमत्तेचा एक रुपयाचा कर टोल कंपनीकडून अद्याप ग्रामपंचायतीला मिळालेला नाही. तद्वतच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर दिशाफलक लावणे,  स्थानिकांना रोजगार दिला नाही, बस थांबा शेडची उभारले नाही, अशा अनेक तक्रारीचा पाढा या सभेत वाचून दाखवला. ग्राम पंचायतचा थकीत कर तात्काळ भराव कराचा भरणा न केल्यामुळे, ग्रामस्थांनी आक्रमक होत टोल इमारत सील करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी बहुमताने ठराव संमत केला.

सदर ग्रामसभेत टोल प्लाझा महामार्गा लागत परिसरात यांचे जन्मगाव दिशादर्शक फलक लावणे, प्रवासी शेड उभारणे,वेस्टेज कचऱ्याचा प्रश्न सोडवणे आदि विषयावर सरपंच सुभाष गडाख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न झाली. तसेच लेखाजोखा अहवाल खर्चाची माहिती विविध योजनांमधील मंजूर विकास कामे, मागासवर्गीय वस्तीतील विकास कामांची माहिती ग्रामपंचायत अधिकारी हरीश गडाख यांनी दिली. यावेळी हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----- Advertisements -----

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.

अज्ञात