रविवारी मालपाणी लॉन्सच्या विटा थरारणार
संगमनेर { भारत रेघाटे }
पंढरपूरच्या मंदिरात आजही विठ्ठल विटेसह कर कटेवर ठेवुनिया उभा आहे.. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, विठू माऊली तू माऊली जगाची, अबीर गुलाल उधळीत रंग ,विठ्ठल आवडी प्रेमभावे, विठ्ठलाच्या पायी थरारली वीट अशा भावपूर्ण भक्तीत तल्लीन होत भावगीतातून एक सुरेल संगमाचा अभंग असलेली मैफील मालपाणी लॉन्स येथे भक्ती गीतातून विठ्ठलाची आळवणी करत थरारणार आहे.

"बोलावा विठ्ठल" असा विठ्ठलाचा धावा करत मालपाणी लॉन्सची वीट न वीट थरारत भक्तीरसात न्हाहून निघणार आहे. आषाढी एकादशी निमित्त संगमनेर महायुतीच्या वतीने रविवार दि. ६ जुलै २०२५ सायंकाळी ६ वाजता "बोलावा विठ्ठल" म्हणत संगमनेर वासियांनाही महायुतीच्या वतीने विठ्ठलाची गाणी ऐकण्याचा बोलावा धाडण्यात येत आहे. विठ्ठला बरोबरच भक्तांनाही विनम्रपणे आवाहन करण्यात येत आहे.
या भक्ती गीतांच्या मैफलीची रंगत संगत या धार्मिक कार्यक्रमाने विठ्ठलाचा धावा करत एकप्रकारे संगमनेर पंढरपूर सारखे गर्जून जाणार आहे. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणी यावर्षी प्रथमच आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शना खाली सुप्रसिद्ध गायक पराग पांडव आणि सुप्रसिद्ध गायिका सुरभी कुलकर्णी हे "बोलावा विठ्ठल" हे बहारदार भक्ती गीते गाणार आहेत. एकीकडे गायक पराग हे आपला 'राग' अनुरागाने विठ्ठल चरणी समर्पित करून गायिका सुरभी सुहाष्य वंदनाने भाव भक्तीच्या गंधात या मैफिलीला सुगंधीत करणार आहे.
या मैफलीत की बोर्ड संगत नरेंद्र साळवे ,संगीत संयोजक सत्यजित सराफ, तबला वादक सिद्धार्थ थत्ते ,पखवाज वादक वैभव पवार, टाळ वादक प्रथमेश बिडवे या कलाकारांची साथ मिळणार आहे. तरी या भक्तीगीत मैफलीला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
