ब्रेकिंग न्यूज :
भारत

रोटरी जीवन जगण्याचे तत्व : डॉ उल्हास कोल्हटकर

Blog Image
एकूण दृश्ये: 296

रोटरी जीवन जगण्याचे तत्व : डॉ उल्हास कोल्हटकर

संगमनेर रोटरीच्या वया एवढाच मी ; आमदार खताळ

दिल्या नवनियुक्तांना शुभेच्छा; केले आवाहन. आयुष्यात कधी आणि कुठेही रोटरीचा उपक्रम आणि कार्यक्रम चुकवू नका 

      संगमनेर { भारत रेघाटे }.                  जे आहे ते समाजाला द्या, समाजाचे चित्र समाजा समोरच मांडा, इतरांनाही दाखवा. जीवनात वाईट गोष्टीचे दमन करता आलेच पाहिजे. व्यक्ती संकुचित होऊ नका ! संकुचित विचारातून लवकर बाहेर पडा. 'मी' पुरते आपण राहिलो तर त्यास मर्यादा येतात. आपण संपवून जावू. सत्व गमावून बसू . दान करा, भिक मागायलाही मागे पुढे पाहू नका. आपले टार्गेटच आर्थिक सक्षमतेने वाढवता आले पाहिजे. आपले अर्थशास्त्रच पारदर्शक असले पाहिजे तरच जीवनाला अर्थ येईल. समर्थ रामदास स्वामींनी समाजापुढे आपली प्रतिमा मांडली. शिवरायांचे विचार आचरणात आणले तर आपले जीवन सुखर होईल .आपली प्रतिमा हेच आपले जीवन आहे. तर रोटरी जीवन जगण्याचे तत्व आहे असे मौलिक प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते डॉ उल्हास कोल्हटकर यांनी केले.

मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या रोटरी क्लब पदग्रहण सोहळ्या ४२ वा वर्धापनदिन दिनानिमित्त डॉ. कोल्हटकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

 डॉ.कोल्हटकर पुढे म्हणाले की, समर्थ रामदासांनी हरिकथा निरूपण सांगत प्रपंच परमार्थ महत्व सांगितले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची व्यापकता रोटरीने आत्मसात करावी. प्लेटो हे वेगळ्या उंचीचे राजनीतिज्ञ होते. चाणक्य हे 'चाणक्य' होते हा आदर्श डोळ्यापुढे घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. संगमनेर हे इंडस्ट्री तसेच एज्युकेशन हब आहे. प्राप्तकर्त्यांची माहिती प्रस्थापित करा . चुका टाळण्यासाठी अचूक माहितीचे सुनिश्चित संकलन करा, नियोजन करा. अर्थशास्त्र आणि विनिमय याचा ताळमेळ आपण तपासला पाहिजे. सुरक्षित प्लॅटफॉर्म वापरला पाहिजे. एखादी गोष्ट साध्य करणे हे उत्तम प्रेरणादायी आणि अभिमानाचे कारण असू शकते. व्यक्तिगत ध्येय असो, व्यावसायिक टप्पे असो अथवा सर्जनशील प्रकल्प असो, एखादी गोष्ट साध्य केल्याने तुम्हाला समाधान आणि समाधानाची भावना मिळू शकते. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी साध्य करायच्या आहे त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी एक योजना बनवा. नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व यांचा संगम म्हणजे संगमनेर रोटरी असे आवर्जून डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले आपले ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित काम करा असा मौलिक सल्लाही डॉ कोल्हटकर यांनी यावेळी दिला.

यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य, माजी अध्यक्ष साईनाथ साबळे, माजी सचिव विश्वनाथ मालाणी, नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वनाथ मालाणी व सचिव सौरभ म्हाळस आदि उपस्थित होते.

   यांची झाली नियुक्ती

सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य, तर विश्वनाथ मालाणी अध्यक्ष, सौरभ म्हाळस सचिव तर संकेत काजळे खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

----- Advertisements -----

यावेळी आमदार अमोल खताळ यांनी रोटरी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करत "रोटरी आय केअर ट्रस्ट हे तालुक्यातील गोरगरीबांसाठी वरदान ठरले आहे" असे गौरवोद्गार काढले असून संगमनेर रोटरीच्या वया इतका मी पण झालो असल्याची आठवण करुन दिली. रोटरीमुळे अनेक. जणांची प्रगती झाली रोटरीचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा असे सांगत. नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. 

       यांचा झाला सन्मान

‘रोटरी सेवा गौरव पुरस्कार’ संत श्री गाडगेबाबा भानूप्रभाकर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. चं. का. देशमुख यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रा. देशमुख यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण असा उल्लेख करत सन्मानाबद्दल रोटरी बाबत कृतज्ञता व्यक्त केली.

----- Advertisements -----

प्रांतपाल रो.सुधीर लातूरे यांचा प्रेरणादायी शुभेच्छा संदेश सहाय्यक प्रांतपाल रो .अमोल वैद्य यांनी वाचून दाखवला. मावळते अध्यक्ष रो. साईनाथ साबळे यांनी वर्षभरातील सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला. यावेळी क्लबच्या परिवारातील विविध क्षेत्रातील यशस्वी सदस्यांचा सन्मान करण्यात आला. पूनम मालाणी, आरती मणियार, सावित्री वाकचौरे, मनस्वी साबळे आणि आदित्य राठी यांना सन्मान पूर्वक गौरव करण्यात आला. तसेच रो. ममता वर्मा यांना ‘रोटरी जीवन संजीवनी पुरस्कार’ देण्यात आला.

नवीन अध्यक्ष रो. विश्वनाथ मालाणी यांनी आपल्या जीवनप्रवासाची एक प्रेरणादायी चित्रफीत सादर केली. तसेच आगामी वर्षातील विविध सामाजिक प्रकल्पांची माहितीही त्यांनी दिली. रोटरी आय केअर ट्रस्टचे अध्यक्ष संजय लाहोटी यांनी संस्थेने राबवलेले विविध प्रकल्प आणि सामाजिक योगदाना बद्दल माहिती दिली.

   नूतन रोटरी कार्यकारिणी

उपाध्यक्ष महेश वाकचौरे, खजिनदार संकेत काजळे, किशोर पोखरकर, राजेंद्र खोसे, साईनाथ साबळे, पवनकुमार वर्मा, दीपक मणियार, आनंद हासे, अजित काकडे, योगेश गाडे, ऋषिकेश मोंढे, विकास लावरे, मनमोहन वर्मा, डॉ. विकास करंजेकर, संकेत मेहता, विक्रम पडताणी, बद्रीनारायण इंदाणी, विनायक नागरे, मधुसूदन करवा, सुनील घुले, संजय राठी, दिलीप मालपाणी, भारतभूषण नावंदर, अमित पवार, रवींद्र पवार, कपिल चांडक, प्रमोद मणियार, संतोष आहेर, सुनील कडलग, संजय लाहोटी, नरेंद्र चांडक, मयूर मेहता, समीर शहा आदींची कार्यकारिणीमध्ये निवड झाली. रो. सुधीर लातूरे हे रोटरी ३१३२ चे प्रांतपाल तर सहा . प्रांतपाल म्हणून रो. अमोल वैद्य काम पहात आहेत. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन रो. भारतभूषण नावंदर व रो. समीर शहा यांनी केले, तर आभार सचिव रो. सौरभ म्हाळस यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण रोटरी परिवाराने उत्स्फूर्त असा सहभाग दिला.

----- Advertisements -----

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर