ब्रेकिंग न्यूज :
भारत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश देशपांडे कालवश

Blog Image
एकूण दृश्ये: 239

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश देशपांडे कालवश

    संगमनेर { प्रतिनिधी }

आपल्या वडिलांचा वारसा तेवढयाच ताकदीने पुढे चालविणारे आणि वडिलांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रीय स्वयं संघाचे तत्व अंगीकारणारे सुरेश देशपांडे यांंचे एका गंभीर आजाराने बुधवार दि.३० जुलै रोजी सकाळी ९ः५८ वाजता त्यांना देवाज्ञा झाली. ते अंतिम समयी ७० वर्षाचे होते.

       सुरेश लक्ष्मण देशपांडे हे स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण मामा देशपांडे यांचे सुपुत्र होत. देशपांडे मामांचा इतिहास देशासाठी अलौकिक होता. वयाच्या १०५ वर्षा पर्यंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. अंतिम क्षणा पर्यंत डोक्यावर परिधान केलेली संघाची काळी टोपी तशीच होती. ब्रिटिश राजवटीत तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी बंदी असताना त्यावेळी देशपांडे मामांनी जणू गनिमी कावा अजमावत एक घरावर वर चढत अखेर पेटीट हायस्कूल येथे तिरंगा फडकवला होता. ही भारत देशाची शान आहे ती अशीच उंच मान करून कायम आकाशाला गवसनी घालणारी राहील. हा संदेश संगमनेरवासियां बरोबर देशाला देत तरूणांना प्रेरित करण्याचे काम त्यांनी केले होते. जिल्ह्यातील तमाम नागरिकांना हे ज्ञात आहे. देशपांडे मामा कडवे राष्ट्रभक्त आणि स्वयंसेवक होते. त्यांचे चि.सुरेशराव हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक होते.

        देशपांडे यांच्या जाण्याने संगमनेर शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. वाणिज्य पदवीधर असलेले सुरेशराव देशपांडे हे मालपाणी इंडस्ट्री मध्येही काही काळ कार्यरत होते. त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी तसेच अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहते घरी राष्ट्रीय स्वयं संघ तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्वयंसंघ आप्तेष्ट स्नेही मित्र परिवाराने घरी एकच गर्दी केली होती. सुरेशराव देशपांडे त्यांची अंतिमयात्रा लक्ष्मण मामा देशपांडे संकुल, नेहरु चौक, त्यांच्या राहत्या घरुन आज सायंकाळी 5 वाजता निघणार आहे. वैकुंठधाम येथे त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली जावई नातवडे असा परिवार आहे.

----- Advertisements -----

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक