ब्रेकिंग न्यूज :
भारत

रेशन धान्य वितरणात दिरंगाई ; शासनाकडे धान्याचे संचित, लाभार्थी मात्र वंचित

Blog Image
एकूण दृश्ये: 233

रेशन धान्य वितरणात दिरंगाई ; शासनाकडे धान्याचे संचित, लाभार्थी मात्र वंचित

    संगमनेर { भारत रेघाटे }

गेली अनेक वर्षापासून रेशन भरण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. ही नैमितिक समस्या येतच असते. तर ती कधीकधी चांगली डोकेदुखी ठरत आहे. शासनाकडे दूरदृष्टी असून उपयोग होत नाही. यामध्ये पारदर्शकताच नसल्याने लाभार्थ्यांना मात्र नाहक त्रास सहन करण्याची वेळ घेऊन ठेपली आहे.

स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांच्या अन्नसुरक्षेचा लाभ धान्य वितरणातील गोंधळ हा नवा विषय नाही. तो ऐनकेन प्रकारे पुढे येतच असतो. पूर परिस्थिती, तसेच पावसाळ्यातील अडचणी दूर होण्यासाठी शासनाकडून तीन महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु उपलब्ध साठा, परिवहनाची कमतरता तसेच स्वस्त धान्यात धान्य ठेवण्यासाठी जागेची कमतरता यातून अनेक अडचणीचा सामना स्वस्त धान्य वितरणका सह लाभार्थ्यांना करण्याची वेळ आलेली आहे. अनियमिततेमुळे, लाभार्थीना  हक्काचे धान्य देण्यात टाळाटाळ केली जाते का ? असा प्रश्न लाभार्थी विचारताना दिसून येत आहे., 

आता शासनाकडून सलग तीन महिन्याचे धान्य एकत्रित देण्यात येत आहे . परंतु उपलब्ध साठा कमी असणे जागेचा अभाव, त्यातच एका व्यक्तीस तीन तीन महिन्याचे धान्य घ्यावे लागत असल्याने लाभार्थ्याला धान्य मिळण्यास विलंब होत आहे. त्यातच आलेला माल लवकर संपल्याने अनेक नागरिकांचे दोन दोन ,तीन तीन दिवस रांगेत उभे राहूनही धान्य मिळाले नसल्याने निराश होत घरी परतावे लागले. ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. अशा एक ना अनेक तक्रारी तालुक्यातील रेशन धारकाकडून येत आहेत. तीन महिण्याऐवजी दोन महिन्यांचे धान्य दिले असते तरी चालले असते. त्यामुळे  अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला असता असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.

----- Advertisements -----

तर कधी केवायसी करण्यासाठी वेठीस धरल्या जाते. तसेच अनेक लाभार्थ्यांना आपल्या वार्डाच्या जवळील रेशन मिळणे अपेक्षित आहे. परंतु त्यांना दूरवरच्या स्वस्त धान्य केंद्रातून धान्य आणावे लागत असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. बायोमेट्रीकमुळे आता यामध्ये बऱ्यापैकी पारदर्शकता आली आहे. तरी देखील रेशन दुकानदारांच्या कारभारा बाबत सतत तक्रारी येत असतात.

काही स्वस्त धान्य दुकानदारा कडून वेळेचा वापर न केल्याने, लाभार्थ्या सोबत नीट न बोलण्याने व नियमालाच केराची टोकरी दाखवून नागरिकांना वेठीस धरल्याने तसेच अनेक लाभार्थ्यांनी तक्रार केल्यामुळे संगमनेर शहरातील कचेरी जवळील स्वस्त धान्याचे दुकान बंद करण्यात आले. येथील लाभार्थ्यांना आता रंगार गल्ली अथवा इंदिरानगर मधून धान्य पुरवठा केला जाणार असल्याचे समजते. सरकारकडे धान्याचे संचित असले तरी नागरिक मात्र  यापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.

----- Advertisements -----

एकूणच नियोजनाचा बोजवारा असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. कुचकमी यंत्रणेमुळे परिवहन आणि जागेचा अभाव असल्याने सरकारचा विचार फोल ठरत आहे . धान्य उपलब्ध असून धान्यासाठीच वाणवा होत आहे. तर दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानात धान्य उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येते. संपूर्ण तालुक्यात 167 स्वस्त धान्याचे दुकान असून शहरात 16 स्वस्त धान्याचे दुकाने आहेत 16 पैकी अनेकांनी एका दुकाना बाबत सतत तक्रारी केल्यामुळे कचेरी जवळील स्वस्त धान्याचे दुकान बंद करण्यात आले आहे. आता 15 स्वस्त धान्याचे दुकाने कार्यरत आहेत. तालुक्यात तब्बल 71 हजार 500 नागरिक या अन्नसुरक्षेचा लाभ घेतात. याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडून सदर समस्या तात्काळ सोडवली जाईल. तसेच येत्या पंधरा दिवसातच तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना धान्य पुरवठा केल्या जाईल असे मांजरे यांनी सांगितले.

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद