ब्रेकिंग न्यूज :
भारत

पत्रकारांवर हल्ल्याचा निषेधार्थ व्हाईस ऑफ मीडियाची एकजूट

Blog Image
एकूण दृश्ये: 109

पत्रकारांवर हल्ल्याचा निषेधार्थ व्हाईस ऑफ मीडियाची एकजूट;  पोलीस उपअधीक्षकांना दिले निवेदन

    संगमनेर : प्रतिनिधी

नाशिक येथील वृत्त वाहिन्यांच्या पत्रकारांवर गुंडांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ व्हाईस ऑफ मीडिया अहिल्यनगर , संगमनेर शाखेच्या वतीने उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना निवेदन देत हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

     नाशिक त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टिव्हीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी नुजचे ब्युरो चीफ किरण ताजणे या तिघांवर नगरपालिकेने पार्किंगचा ठेका दिलेल्या गुंडांनी तिघांवर प्राण घातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे असून, सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात पत्रकारांवर उपचार सुरू आहेत. तर पुढारी न्युज चे किरण ताजने हे गंभीर जखमी असून यांच्यावर नाशिक येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेने बाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

----- Advertisements -----

       सदर घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्य कोअर कमिटीचे प्रमुख गोरक्षनाथ मदने, व्हॉइस व्हाईस ऑफ मीडिया सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख, खजिनदार गोरक्ष नेहे, तालुकाध्यक्ष महेश पगारे, कार्याध्यक्ष भारत रेघाटे, सचिव सचिन जंत्रे, विश्वनाथ घुले, ओंकार सस्कर, सुखदेव गाडेकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पत्रकारांवरील हल्ले थांबविण्यासाठी विशेष कायदा व ठोस धोरणाची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी