ब्रेकिंग न्यूज :
भारत

*पैसे वाटणारे नेते येतात आणि जातात* खासदार :संजय राऊत

Blog Image
एकूण दृश्ये: 159

पैसे वाटणारे नेते येतात आणि जातात; खासदार संजय राऊत

संगमनेरात धडाडली खासदार राऊत यांची बुलंद तोफ

स्वातंत्र्य उत्सव हा विजयाचा उत्सव ; कर्मकांडाने क्रांती घडत नाही 

डिग्रसच्या भेटीने लावले जातात वेगवेगळे गेस

       संगमनेर : भारत रेघाटे

        आपण सत्तेवर येवू ही शाश्वतीच राहिली नसल्याने इथल्या जनतेची दिशाभूल करत खोटेपणा आणि गद्दारी करीत पैसा वाटपाचा सपाटा लावणारे असे कैक आले गेले. पैसे वाटणारे अनेक नेते येतात आणि जातात असे खडे बोल खासदार संजय राऊत यांनी संगमनेर येथील एका कार्यक्रमात विरोधकांना आपल्या खास शैलीत सुनावले.

         डिग्रस येथे श्री बाबींवर बुवा व बुवाजी बाबा यात्रा उत्सव आणि आध्यात्मिक सोहळ्या प्रसंगी खासदार संजय राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रणजीतसिंह देशमुख, महंत उध्दव महाराज मंडलिक, महंत बुवाजी बाबा पुणेकर, महंत उमाजी तात्या पुणेकर . संस्थेचे सचिव जानकीराम पुणेकर, महंत बबनराव सांगळे, बाळासाहेब तात्या पुंड, डॉ जयश्री थोरात, शंकर खेमनर, शिवसेनेचे माजी शहर अध्यक्ष अमर कतारी, शहर प्रमुख रवींद्र कानकाटे, जिल्हा प्रमुख अमीत चव्हाण, रवींद्र पुणेकर, राहुल खेमनर, निवृत्ती महाराज पालखी सोहळा नाशिकचे विश्वस्त गांगुर्डे महाराज यांच्यासह डिग्रस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          खासदार राऊत म्हणाले की, देवाच्या नावावर काम करणाऱ्या लोकांनी देवासारखे वागावे. देव माणसामुळेच येथील राज्य होते आणि राहणार आहे, त्यांनीच महाराष्ट्र धर्म जागवला आहे , या भागाला परिसराला एक विकासाचा चेहरा बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांच्या मागे ठामपणे उभे राहा असा सल्लाही राऊत यांनी यावेळी दिला. पाणी आणि शिक्षण देणारा नेता असतो. आणि तोच खरा नेता असतो. पैसे वाटणारे नेते येतात आणि जातात असे राऊत म्हणाले. आता महाराष्ट्रात आणि देशात शंभर टक्के बदलाच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे .या जागृत देवाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो. मी सांगतो तेच भविष्यात खरं होणार आहे. आता हे बदलाचे वारे वाहत असल्याने या देशाची आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी पुन्हा आपणास लाभणार आहे. असा ठाम विश्वास खासदार राऊत यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या संगमनेर येथील डिग्रस यात्रा उत्सवात व्यक्त केला. राऊत पुढे म्हणाले, मी देवळात फार कमी जातो परंतु हिंदुत्वाचा ज्वलंत विचार आणि प्रचार प्रखरतेने आणि तेवढ्याच विश्वासाने करतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पगडा आपल्या मनावर बिंबवला असून त्यांच्या सहवासात ४० वर्ष मी सातत्याने काम केले. त्यामध्ये मग सभा असतील, आमचा रोखठोक सामना असेल, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा माणूस मी आहे. मी कितीही टाळले तरी या देवस्थानाला यावच लागतं कारण या देवस्थानात माणसाला ओढ लावण्याची ताकद आहे .

----- Advertisements -----

      महंत पुणेकर बाबा म्हणाले, काय मागायचे ते मागा !  मी म्हणालो, मला भरभरून मिळाले ! मी काय मागणार ?  तर ते म्हणाले, हे जागत देवस्थान आहे. "पक्ष आणि चिन्ह" परत मागा ते मिळणारच ! तुमच्या मनोकामना निश्चित पूर्ण होतील. महाराष्ट्रातल्या प्रेमात वेगळीच ताकद आहे. खासदार राऊत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विषयी म्हणाले की, पाणी शिक्षण या सोबतच त्यांनी महाराष्ट्राला भरभरून दिले. येथील जनतेला सर्व काही दिले. परंतु यावेळी जनतेने विधानसभेत त्यांना पाठवले नाही. याबाबत माझी तक्रारच आहे. त्याची खंत मला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्यांच्या पराभवाची खंत वाटते. बाळासाहेब थोरात सारखा मोहरा विधानसभेत का गेला नाही ? या ठिकाणी खोटेपणाचा विजय का झाला ? थोरात सारख्या माणसाने या महाराष्ट्रासाठी देशासाठी चांगले काम केले. त्यांचे हक्क आणि संधी त्यांना मिळालीच पाहिजे असेह राऊत म्हणाले.

तत्पूर्वी महंत बुवाजीबाबा पुणेकर यांच्या हस्ते खासदार संजय राऊत यांचा सत्कार करण्यात आला 

उद्धव ठाकरे सरकार ने महाराष्ट्रातल्या जनतेचे प्राण वाचविले :                          उद्धव ठाकरे हे आमचे आणि महाराष्ट्राचे सरकार आहे. आम्ही उद्धवांना आमचे सरकार मानतो. ते आमचेच नव्हे तर महाराष्ट्राचे सरकार असल्याचे आपल्या खास शैलीत त्यांनी याबाबतचा नाम्मोल्लेख आवर्जून केला.

         केवळ अडीच वर्षात उध्दव ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय करायचे बाकी ठेवले होते ? असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. जात, पात, धर्म, पंथाला बाजूला सरून कोरोनाच्या काळात एक विश्वसनीय काम उद्धव सरकारच्या कार्यकाळात झालेले आहे. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व असलेल्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवण्याचे मोठे काम केले. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात बेवारस मृतदेह त्या गंगेत सोडली जात असत. महाराष्ट्रात अहोरात्र काय चालले याची शहानिशा करून वैद्यकीय सेवा नीट पोहोचतात का नाही ? याची काळजी वाहत होते. खोटेपणाने आणि गद्दारी करूनच उद्धव ठाकरेचे सरकार पाडण्यात आले असल्याचे राऊत म्हणाले.

गद्दारीचे रक्त सैनिकाच्या अंगात जाता कामा नये 

उपमुख्यमंत्री श्रीनगरला रक्तदान करायला गेले. ते सैनिकाला रक्त देणार असल्याचे मला समजले मी पत्र देवून यास विरोध केला. सैनिकाच्या अंगात गद्दारीचे रक्त कदापि जाता कामा नये. आमचे सैन्य स्वाभिमानी आहे, शूर आहे, ते डरपोक नाही. गद्दारीचे रक्त दिल्यास हा आमच्या सैन्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा अपमान ठरेल. गद्दारीचे रक्त सैन्याच्या अंगात गेल्यास आपल्या देशावर फार मोठी आफत येईल, संकट निर्माण होईल. यासाठी आपण सरकारला सावधगिरीचा इशाराच या पत्रातून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

----- Advertisements -----

 हेही दिवस जातील!

यात्रेतील भक्तगण, प्रेक्षक, संगमनेर तालुक्यातील जनता ग्रामस्थ या सर्वांना हेही दिवस जाणार आहेत असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी दाखवला. कारण राहुल गांधीच्या तुफान नेतृत्वाखाली आज देश ढवळून निघत आहे.

या देशाचे नेतृत्व राहुल गांधीच करणार

राहुल गांधी सारखा नेता या देशाला भविष्यात नक्कीच लाभणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारण राहुल गांधी रोजच या सरकारच्या खोटेपणाचा बुरखा टराटर फाडत आहेत. खोटारडे सरकार सत्तेवर कसे आले ? बनावट मतदार, खोटे मतदार, बनावट याद्या याचे उत्तम उदाहरण देताना महाभारतातही 100 कौरव कसे होते, याचे उत्तम उदाहरण युपी, बिहार, वाराणसी, लखनऊ मध्ये दिसून आल्याचे ते म्हणाले. एका एका माणसाला शंभर शंभर, सव्वाशे सव्वाशे मुले असल्याचे दाखवून खोट्या याद्या सादर करून हे सरकार सत्तेवर आल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यास संगमनेर ही अपवाद नाही. या कलियुगात मतदार यादी मध्ये एका एका आई बापाला 100 मुले असल्याचे आणि खोट्या याद्याचा चमत्कार महायुतीच्या काळातच होवू शकतो. आपण सर्व त्यांचे आता बुरखे फाडत आहोत. हा खोटेपणा फार काळ टिकणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 भारत देशाला फार मोठे धार्मिक अधिष्ठान लाभलेले आहे.

आपल्या इथे धर्माचं राज्य आहे. भारत आणि महाराष्ट्र सहज निर्माण झाला नाही. तो आकाशातून खाली पडला नसून त्यास फार मोठे धार्मिक अधिष्ठान लाभलेले आहे. संत, महात्मे यांची पुण्याई आणि तपस्या या देशाला कामी आलेली आहे. त्यामुळे हा देश एकसंघ उभा राहिलेला आहे. परंतु यापुढे खोटं राज्य आणि खोटे सरकार या ठिकाणी येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेर शहर प्रमुख रवींद्र कानकांटे यांच्या हस्ते खासदार संजय राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

----- Advertisements -----

 

 

30,000 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे ऐतिहासिक काम केले. :- थोरात

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, डिग्रस चे हे देवस्थान तालुक्याचे आणि आमचे श्रद्धास्थान आहे. येथे शेकडो बकऱ्यांचे बळी देण्याची परंपरा होती. परंतु संत नारायण गिरी महाराज यांचा सप्ताह या ठिकाणी झाला तेव्हापासून ही प्रथा बंद पडली. अकोले जिल्ह्यातील आकडा बाळापूर येथील बंद झालेली शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आली. मी शिक्षण मंत्री असताना या परिसरामध्ये शाळा सुरू केली श त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेऊन काम करत आहेत. निळवंडे धरण आणि कालवे आपण पूर्ण केले. हे सर्वांना माहीत आहे. ज्यांचे योगदान नाही ते आता जलनायक म्हणून घेण्यासाठी पुढे येत आहे. आम्ही आणलेले पाणी ते सोडतात  परंतु जनतेला खरे माहिती आहे. निळवंडे साठी सतत पाठपुरावा आपण केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मोठा निधी मिळून कामे अंतिम टप्प्यात आणली. फक्त उद्घाटन बाकी ठेवले होते. आणि ते त्यांनी केले. यामध्ये त्यांचे कोणतेही योगदान नाही असे सांगताना महाविकास आघाडी सरकार बनवण्यामध्ये खासदार संजय राऊत यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. शिवाजी पार्कवर लाखो जनतेच्या उपस्थितीमध्ये आपण शपथ घेतली आणि पहिल्याच मिटिंग मध्ये विना अट 30,000 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे ऐतिहासिक काम केले.

----- Advertisements -----

भाव असणे हे भाग्याचे लक्षण :- महंत उध्दव महाराज मंडलिक

पर धर्माला आपण नाव ठेवतो. परंतु आपलीच माणसे आपला धर्मभ्रष्ट करतात. माणसा जवळ सर्व बळ पाहिजे. बुद्धीचे बळ पाहिजे, भावबळ पाहिजे, सत्तेचे बळ पाहिजे. सत्ता,संपत्ती, याहीपेक्षा बुद्धी हे सर्वश्रेष्ठ ठरते. बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ भाव ठरतो. शरीराची शक्ती आहे. सत्ता, संपत्ती आहे. संपत्तीचा वापर कसा करावा यासाठी बुद्धीच लागते. पैशाने सुविधा मिळतात, भक्ती भावाने आशीर्वाद मिळतात‌ भाव असल्याने श्रीमंती आणि संस्कृती, सत्ता, संपत्ती एका ठिकाणी नांदताना दिसून येतात. भाव असणे हे भाग्याचे लक्षण असल्याचे महंत उध्दव महाराज मंडलिक यांनी आपल्या रसाळवाणीतून प्रबोधन केले.

देशभराच्या मतदार याद्यात मोठा घोळ

महाराष्ट्रात 58 विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत घोळ झालेला आहे. मग संगमनेरची यादी अपवाद कशी असेल ? संगमनेरची यादी आपण पाहिलेली असून कोणत्याही परिस्थितीत बीजेपी आणि मित्रपक्ष या ठिकाणी जिंकूच शकले नसते याचे उदाहरण देत त्यांनी यादीतील घोटाळ्यामुळे संगमनेर मध्ये बोगस विजय झाल्याचे राऊत म्हणाले. राहुल गांधीचे आंदोलन हे एकमेवाद्वितीय आहे ,ते साधे नाही. 

जयप्रकाश नारायण यांच्या आकलना पेक्षा हे आंदोलन अधिक प्रभावीपणे मोठे होणार आहे. अत्यंत खोटेपणाच्या फसवणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेवर आलेत. त्यांना सत्ता सोडावीच लागेल असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. महापालिका सरकारची नसते ? हे आम्हाला आता समजायला लागले. महापालिकेवर सत्ता कोणाची आहे ? लोकनियुक्त सरकारच नाही ! राज्यातील 25 महानगरपालिका खासगीरित्या फडणवीस यांच्या ताब्यात आहेत. मुंबई पासून नागपूरपर्यंत त्यांनी प्रशासक नेमले नाही. आयुक्त त्यांनी नेमले, निर्णय ते घेतात. हवे तसे ते बदलतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाची माहितीच नाही अशी खरबरीत टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ते महाराष्ट्राचे दोन वेळेस सीऐम होते. फुटकळ विधाने करणे शोभत नाही. त्यांनी असे बालिश वक्तव्य करू नयेत. 

----- Advertisements -----

शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांच्या हस्ते खासदार संजय राऊत यांचा सत्कार करण्यात आला .

स्वातंत्र्य उत्सव हा विजयाचा उत्सव आहे.

---- स्वातंत्र्य उत्सव हा सोहळा आहे. हा विजयाचा उत्सव आहे, तो शौर्य दिवस आहे . उपास करून कर्मकांड करून क्रांती घडत नाही कर्मकांड केले असते तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते! त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगतसिंगाचे साहित्य वाचावे फालतू आदेश काढून क्रांती घडून आणली नाही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाया बरोबर अनेक संप्रदायास परंपरेचा वारसा आहे परंपरेने जे शाकाहारी आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे. परंतु देशाचे सैन्य, पोलीस दल, शाकाहारावर चालत नाही त्यांचा आहार त्यांना द्यावाच लागतो एखाद्याच्या आहारावर कोणी बंदी आणू शकत नाही. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये विशेष करून मुंबईतील घडामोडी लक्षात घेणे गरजेचे आहे. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी असल्याचे राऊत म्हणाले.

----- Advertisements -----

श्रमाशिवाय फळ मिळत नाही.

लोकमान्य टिळक