प्रवाशांच्या हस्ते नव्या बसेस चे पूजन ;पाच बीएस 6 बसेस दाखल ; पंढरीत दर्शनासाठी दाखल
छत्रपती संभाजीनगर (भारत रेघाटे)
छत्रपती संभाजी नगर येथील मध्यवर्ती बस स्थानकात CBS मध्ये बी एस सिक्सच्या पाच नवीन बसेस दाखल होताच. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या प्रवाशांनीच या बस चे पूजन केले. पाहुण्यांनी बसला पुष्पहार अर्पण केला. तसेच, यावेळी बस चालकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या बसेस पंढरपूरला रवानाही करण्यात आल्या. नव्या बस मध्ये प्रवासी बसताच प्रवासांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये बी एस सिक्स या पाच बसेस शनिवारी पाच जुलै रोजी दाखल होताच प्रवासीच या कार्यक्रमाचे पाहुणे बनले. प्रवाशांनीच या बसचे पूजनही केले.

यावेळी पंढरपूरला जाणारे मुक्ताईनगर चे रहिवासी दाम्पत्य विठ्ठृलभक्त नारायण राजाराम वानखेडे, लीलाबाई वानखेडे यांनी विठ्ठलाचा धावा घेत पंढरपूरला जाणाऱ्या पहिल्या बस मध्ये बस पाहुण्यांनी आणि इतर सहप्रवाशांनी पंढरपूरकडे प्रयाण केले. या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आगार व्यवस्थापक अजय पाटील, स वा अ संतोष नजन सकाअ ओमप्रकाश काकडे, निरीक्षक ललित शहा, बाळासाहेब साळुंखे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांच्यासह आगारातील पर्यवेक्षक कर्मचारी, चालक आणि वाहक उपस्थित होते.
यापूर्वी गुढीपाडव्याला प्रथमच पाच नवीन बसेस सुरू करण्यात आल्या होत्या, त्यानंतर ५ जुलै रोजी पाच नवीन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आता सीबीएस मधून एकूण ११० बसेस धावणार आहेत. प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळेनुसार उचित ठिकाणी सोडविण्याची सोय आगारा मार्फत केली जाते असे आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी सांगितले.
