ब्रेकिंग न्यूज :
भारत

पारदर्शक निवडणुकीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करा

Blog Image
एकूण दृश्ये: 63

पारदर्शक निवडणुकीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

    संगमनेर : प्रतिनिधी 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि निःपक्षपाती व शांततेत पार पडाव्यात यासाठी संगमनेर शहर पोलीसात कार्यरत स्थानिक रहिवासी (होमटाऊन रेसिडेंट) पोलीस कर्मचाऱ्यांची, तसेच वादग्रस्त पोलीस कर्मचारी यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना अंतिम झाली असून नगराध्यक्षपदाच्या सोडतीही पार पडल्या आहेत. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने याबाबत निर्णय घ्यावा . स्थानिक राजकारणात अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी व आर्थिक लाभासाठी विविध माध्यमांतून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असा गंभीर आरोप अमर कतारी यांनी केला आहे.

अशा कर्मचाऱ्याकडून त्याच्या पदाचा दुरूपयोग होवू नये हितसंबंधाचा तसेच व्यापारी वर्गांना वेठीस धरणा-या अशा पोलीस कर्मचारी यांची बदली करावी असेही निवेदनात म्हटले आहे. शिवसेना माजी शहरप्रमुख अमर खतारी वाहतूक सेना शहर प्रमुख इम्तियाज भाई शेख, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय सातपुते, उप तालुकाप्रमुख भाऊसाहेब हराळे ,अमित फटांगरे रंगनाथजी फटांगरे, योगेश खेमनर, युवासेना तालुकाप्रमुख लखन सोन्नर युवासेना तालुकाप्रमुख सागर भागवत, संभव लोढा, वैभव अभंग ,मुस्लिम मावळा अजीज मोमीन, सचिन साळवे , दीपक साळुंखे आसिफ तांबोळी व शिवसैनिकांची मागणी केली आहे.

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद