प्रांत कार्यालयालयावर शेकडो जर्सी भाकड गोऱ्यासह शिवआर्मी संघटना धडकली ; आवारात सैरावैरा धावले बछडे ; शेतकरी, प्रशासन, पोलीसही एकमेका समोर ;ही तर शेतकऱ्यांच्या जीवन मरणाची लढाई : चार तास चालले आंदोलन
संगमनेर : भारत रेघाटे
पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवून शेकडोच्या संख्येने भाकड जर्सी गोऱ्यासह अनेक शेतक -यांनी धडक मोर्चा काढत प्रांत कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला.

भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकऱ्यांना जनावरांसह तीव्र आंदोलन करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आल्याचे दिसून आले.. या आंदोलनाचे नेतृत्व शिव आर्मी संघटनेचे अध्यक्ष दत्ता ढगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी संगमनेर तालुक्यातील गावा गावातील अनेक शेतकरी आणि बछडे प्रांत कार्यालयावर एकत्रित आले.

प्रशासनाच्या विरोधात यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून शेकडो जर्सी आणि गो-र्हे घेऊन शेतकरी प्रांत कार्यालयावर धडकले. यावेळी प्रांत कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एकीकडे शेतकरी, प्रशासन आणि पोलीस समोरासमोर आले. तर दुसरीकडे ही भाकड जनावराचे बछडे प्रांत कार्यालयाच्या आवारात आणि रस्त्यावर सैरावर धावत होती. प्रशासनाचे पदाधिकारी कर्मचारी आंदोलनस्थळी लवकर न आल्याने शेवटी लावलेले सुरक्षा बॅरिगेट्स काढून प्रांत कार्यालयात आंदोलकांनी आपला मोर्चा वळवला.

दिवसेंदिवस भाकड जनावराची समस्या ही अत्यंत बिकट होत असून या समस्येच्या बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्याची गरज आहे, शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. अखेर या भाकड जनावरांचे करायचे काय ? असा प्रश्न उभा राहिला असून प्रशासन याबाबत नेमकी भूमिका आणि कोणता निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता कायद्याच्या विरोधातच आवाज उठवण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्याने शेतकऱ्याने एकजूट दाखवत हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले. मागे काही दिवसांपूर्वी दहा भाकड जनावरांना पांजरपोळ येथे दाखल करण्यात आले होते. आता तब्बल शेकडोच्या संख्येने या गोऱ्यांना प्रांत कार्यालयातच आणून सोडत आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन यापेक्षाही तीव्र करणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी शेतकरी म्हणाले की, आमचा उदरनिर्वाह विषय असून दुधाच्या भरोसावर चालतो. पण प्रशासनाने आमच्या जीवनामध्ये माती कालविण्याचे काम केले. या जनावरास लंम्पी सारखे आजार होतात अशा गंभीर आजाराकडे सरकारचे लक्ष वेधले. तब्बल चार पाच तास हे आंदोलन चालले असून शेवटी प्रांत कार्यालयाच्या आवारात या गोऱ्यांना सोडण्यात आले. अखेर या जनावरांना टॅग लावत पांजरपोळ येथे दाखल करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार गणेश माळवे यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलन अधिक तीव्र करणार :- शिवआर्मी संघटना
भाकड जनावरांचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून शेतकऱ्यांच्या जीवन मरण्याची लढाई बनत चालला आहे एवढेच नाही तर या जनावरांमध्ये लक्षणीय संख्या वाढत असल्याने आरोग्यासह आर्थिक कुचंबना तसेच रस्त्यावरील नागरिकांनाही घातक ठरत ठरूपात असल्याचे चित्रीकरण आंदोलनाच्या दरम्यान दाखवण्यात आले. ही परिस्थिती भविष्यात भयावह असून त्याचे दुष्परिणामही आम्हास भोगावे लागणार असल्याचे शिव आर्मी संघटनेचे अध्यक्ष दत्ता ढगे यांनी सांगितले.

या आहेत मागण्या
भाकड जनावराची सरकारने खरेदी योजना राबवून बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी, जनावरांचे संगोपन करण्यासाठी गोशाळा अथवा शासकीय केंद्र उभारावी, मोकाट जनावराची व्यवस्था सरकारने करावी, जनावरा कडून नागरिकास झालेली हानी त्याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी, बेवारस जनावरांची ही निगरानी सरकारने करावी, स्वदेशी गाईची उत्पादकता वाढवावी, कायदेशीर गोवंश वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या गोरक्षकाचा बंदोबस्त करा, पांजरपोळ येथे दाखल केलेल्या जनावरांचे ऑडिट करा, भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ या विषयावर रोख आणून पशुखाद्य व औषधाचे नियंत्रण करावे आदि मागण्या यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.
