ब्रेकिंग न्यूज :
भारत

प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञाच्या डोक्यात घातल्या विटा ; केले लहुलुहान ; अल्पवयीन ताब्यात

Blog Image
एकूण दृश्ये: 133

प्रशिक्षण केंद्रातील  तंत्रज्ञाच्या डोक्यात घातल्या विटा ; केले लहुलुहान ; अल्पवयीन ताब्यात

   संगमनेर : प्रतिनिधी

दारू प्यायला पैसे न दिल्याने संतापलेल्या एका १७ वर्षीय मुलाने ५३ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संगमनेर शहरासह तालुका आणि ग्रामीण भाग हादरून गेला आहे.

शहरातील परदेशपुरा भागात मंगळवार दि ५ ताराखेला रात्री ११:२० ते ११:४५ दरम्यान ही घटना घडली. घडलेल्या घटनेत सुहास रामचंद्र वाघमारे वय वर्ष 53 हे सांगली हल्ली मुक्काम संगमनेर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील परदेशपुरा येथील देशीदारू दुकानाच्या समोर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास रामचंद्र वाघमारे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने या दोघात वादावदी झाली. या बाचाबाचीतून संतापलेल्या एका अल्पवयीन मुलाने सुहास वाघमारे यांना खाली पाडत त्यांच्यावर चार पाच वेळ डोक्यात मोठ्या विटा घालत जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाण करून तो पसार झाला.

या घटनेत सुहास वाघमारे हे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. त्यांच्या डोक्यावर, तोंडावर, मानेवर कानावर , गळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना एका खासगी दवाखान्यात भरती केले असून ते अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत आहेत. याप्रकरणी पोलीस अजित कु-हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माधव टॉकीज परिसरातील १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले असून भारतीय न्यायसंहिता 109, 118,(1) 118 (2) प्रमाणे बुधवार दिनांक 6 तारखेला सायंकाळी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे करीत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण सुहास वाघमारे यांच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने टणक वस्तु मारत असल्याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ पाहायला मिळाला. 

----- Advertisements -----

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin