ब्रेकिंग न्यूज :
भारत

प्रसाद देण्याच्या बहाण्याने वयोवृद्धाला लुटले;

Blog Image
एकूण दृश्ये: 87

प्रसाद देण्याच्या बहाण्याने वयोवृद्धाला लुटले; दोन अंगठ्या सिताफिने केल्या लंपास, भामटे फरार

    संगमनेर प्रतिनिधी

आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्यात अडवून प्रसाद देण्याच्या बहाण्याने एका वयोवृद्ध व्यक्तीच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या हातचलाखी करत लंपास केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिनकर विठोबा दिघे (वय ६८, रा. जोर्वे हे मंगळवार दि २३ सप्टेंबर ला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरून घरी परतत असताना चंदनापुरी घाटाखालील बाबा मंदिराजवळ दोन अनोळखी तरुणांनी त्यांना थांबवले. या दोन्ही आरोपींनी दिघे यांचा विश्वास संपादन करत त्यांना खाण्यासाठी प्रसाद देण्याचा बहाना केला हातात प्रसाद देतानाच या भामट्यांनी हातच्यालाखीने त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या प्रसाद लावण्याच्या पाहण्याने केव्हा काढून घेतल्या हे लक्षात आले नाही. दिघे यांच्याकडे प्रत्येकी नऊ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या 

आरोपींनी हातचलाखीने अंगठ्या स्वतःकडे ठेवून त्याऐवजी एका पुडीमध्ये अंगठ्या बांधून दिल्याचे सांगत दिघे यांना परत दिल्या. त्यानंतर काही वेळाने दिघे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

----- Advertisements -----

दिघे यांच्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटोळे करत असून आरोपी पसार झाले आहेत.

 

 

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin