ब्रेकिंग न्यूज :
भारत

पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले युवक काँग्रेस एकवीरा फाउंडेशन साहित्याचे वाटप

Blog Image
एकूण दृश्ये: 60

पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले युवक काँग्रेस एकवीरा फाउंडेशन ; साहित्याचे वाटप

   संगमनेर : प्रतिनिधी

     काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एकवीरा फाउंडेशनच्या वतीने अतिवृष्टीनत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किराणा, उपयोगी वस्तू, शालेय साहित्य पाठवण्यात आले आहे.

   यशोधन कार्यालयातून साहित्य घेऊन ट्रक रवाना झाला. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मुख्याधिकारी किशोर भांड ,रामदास तांबडे, युवक काँग्रेसचे डॉ विजय पवार, शरद पावबाके,नामदेव कहांडळ, आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने बिहारमध्ये येऊन मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव येथे नुकसानीची पाहणी करत तातडीने सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सह मदत करावी अशी आग्रही मागणी केली.

----- Advertisements -----

       नुकसानग्रस्तांच्या भेटीनंतर त्यांना तातडीने मदत मिळावी याकरता अमृत उद्योग समूहाच्या वतीने मदत पाठवण्यात आली याचबरोबर युवक काँग्रेसचे अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व व्यापारी यांना या नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.

        या मदतीनंतर विविध नागरिक व कार्यकर्ते व्यापारी यांनी पूरग्रस्तांसाठी गृहपयोगी साहित्य, किराणा, विद्यार्थ्यां साठी शालेय साहित्य मेडिकल दिले आहे. अहिल्यानगर पाथर्डी शेवगाव जालना जिल्ह्यामधील विविध गावांमधील नुकसानग्रस्तांना पाठवण्यात आला आहे.

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम