ब्रेकिंग न्यूज :
भारत

प्रभावशाली प्रश्नांनी वेधले आमदार सत्यजीत तांबें नी विधानसभेचे लक्ष ;

Blog Image
एकूण दृश्ये: 194

प्रभावशाली प्रश्नांनी वेधले आमदार सत्यजीत तांबें नी  विधानसभेचे लक्ष ;           

        मुद्द्याला धरून ;

▪️विधेयकाचे स्वागत करत ; सरकारवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली.

▪️उद्योगपतींच्या नव्हे, कष्ट करणाऱ्यावर देशाची अर्थव्यवस्था आणि आपला देश उभा आहे.

     संगमनेर { भारत रेघाटे }

आदिवासी समाज हा जल जंगल आणि जमीन यांच्यावर खऱ्या अर्थाने अधिकार असलेला मूळनिवासी समाज आहे. अनुसूचित जाती जमाती,बारा बलुतेदार,18 पगड समाज या सर्वांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना गरजेचे असून आदिवासी विभागातील परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र आयोग हा अत्यावश्यकच होता अशा शब्दात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी या आयोगाचे स्वागत केले असून राज्यातील आदिवासी विभागातील अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी स्वतंत्र आयोगावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र आयोग हा अत्यंत गरजेचा होता. या विधेयकाचे मी स्वागत करत असून आदिवासी बांधवांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हा आयोग काम करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे,नंदुरबार या जिल्ह्यांसह चोपडा तालुका तसेच तापी खोऱ्यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, सटाणा, त्रंबकेश्वर या भागासह आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत आहेत.

आदिवासींचे अनेक प्रश्न असून छत्तीसगड,मध्यप्रदेश या ठिकाणी यापूर्वीच अनुसूचित जाती व जमातींसाठी स्वतंत्र आयोग केला आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार 12% मागासवर्गीय व 9.5% आदिवासी समाज देशात आहेत.18 पगड जाती 12 बलुतेदार यांच्यासाठीही या आयोगाकडे स्वतंत्र प्रश्न मांडले जाणार आहेत. त्यांना न्याय मिळेल यासाठी आयोगातून काम होणार आहे.

----- Advertisements -----

राज्यामध्ये विविध आयोगाच्या कामकाजाचे परीक्षण झाले पाहिजे महिला आयोगाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुण्यामध्ये महिला असुरक्षित असून या आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

आदिवासी विभागात परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. याचप्रमाणे आदिवासी आश्रम शाळा, वस्तीग्रह यांची परिस्थिती सुद्धा वाईट आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा नाही. या सर्वांचे थर्ड पार्टी ऑडिट झाले पाहिजे. आदिवासी भागातील रस्ते आणि विकासाची कामे निकृष्ट दर्जाची होत असतात. या आयोगामार्फत अशा ठेकेदार,भ्रष्टाचारी अधिकारी या सर्वांवर कारवाई करण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. फक्त सुनावण्या घेण्यासाठी आयोग नको असे सांगताना जल,जमीन, जंगल हा आपला अभिमान असून देशाच्या प्रगतीमध्ये 18 पगड जाती व बारा बलुतेदार यांचीही मोठे योगदान असून या सर्वांच्या विकासासाठी या आयोगामार्फत काम होईल असा विश्वास व्यक्त करताना या समाजाला मुख्य प्रवाहात आणले जाईल असे ते म्हणाले. याचबरोबर सिर्फ हंगामा खडा करना इतना मकसद नही होना चाहिये,सुरत बदलनी चाहिए हे सांगून त्यांनी या आयोगाचे स्वागत केले. 

प्रभावशाली प्रश्नांनी वेधले  आमदार सत्यजीत तांबें नी  विधानसभेचे लक्ष ;

     काय म्हणाले ? 

▪️हंगामा खडा करना आयोग का मकसद नही होना चाहिए। मकसद ऐसा भी होना चाहिये सुरत बदलनी चाहिये ।

----- Advertisements -----

▪️निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झालाच पाहिजे.

▪️पुण्याच्या घटनेतून महिला आयोगाची अवस्था चव्हाट्यावर आली. 

▪️मी पाच वर्षाच्या काळामध्ये साकूर आदिवासी वस्त्यांसाठी रस्ते वीज पाणी दवाखाना सेवा उपलब्ध केल्याचा मला आनंद आहे.

▪️आदिवासी विधेयकाचे केले स्वागत

▪️ऑस्ट्रेलियाचे सांगितले अनुभव ऑस्ट्रेलियाचा आदर्श आपण घेतला पाहिजे.

----- Advertisements -----

▪️आयोगा खरा उद्देश समाजाला न्याय देण्याचा आहे.

▪️आदिवासी, मागासवर्गीय समाजाची परिस्थिती बदलली पाहिजे

▪️विधानसभेमध्ये जवळ जवळ 288 पैकी 25 जागा अनुसूचित आज मात्र मला एकही प्रतिनिधी या दिवशी समाजाचा या सभागृह दिसत नाही* खंत केले व्यक्त

 ▪️आयोगांचं कामकाज दर्जेदार व्हायला हवे आहे. त्यावर अभ्यास व्हायला पाहिजे.

▪️ आदिवासी समाजाचे स्वतंत्र प्रश्न यातून सुटले जातील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला 

----- Advertisements -----

▪️पूर्वी अकोल्यात असलेल्या संगमनेर चा भाग असल्याने तो दुर्लक्षित राहिला 

▪️आयोगाच्या माध्यमातून चपराक बसली पाहिजे मानसिकता बदलली पाहिजे

▪️थर्ड पार्टी ऑडिट केले पाहिजे 

▪️खडसे, चित्रा वाघ चे केले कौतुक

▪️आत्मपरीक्षण करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे.

----- Advertisements -----

▪️ठेकेदारावर ओढले ताशेरे 

▪️ॲट्रॉसिट्री हा अत्याचार हा फक्त मारहाणीतून नको तर आदिवासी भागात विकासात भ्रष्टाचार आढल्यास ॲट्रॉसिटी दाखल करा

▪️अंबानी आदानी पेक्षा 18 पगड जाती, बारा बलुतेदारांच्या कष्टावर देशाची अर्थव्यवस्था आणि आपला देश  उभा आहे.

 

 

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद