ब्रेकिंग न्यूज :
भारत

पालिकेची वळलीच नाही पावले ? अखेर

Blog Image
एकूण दृश्ये: 210

पालिकेची वळलीच नाही पावले ? अखेर तरुणच धावले ! गायी जवळ सोडला तान्हा ;अन् सुटला पान्हा 

      संगमनेर : भारत रेघाटे

जनावर धरपकड कार्यवाहीने नगर पालिकेच्या आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट झाले असून पालिकेच्या ढिसाळ कारवाईमध्ये गायी ऐवजी बछड्यांनाच पकडून नेल्याने साळी वाड्यातील गायांचा हंबरडा बायांच्या माध्यमातून पालिकेत पोहोचला खरा. परंतु ,पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सुस्तावलेल्या कर्मचाऱ्यांना काही केल्या पाझर फुटलाच नाही. एवढेच नव्हे तर त्यांची पावलेही वळले नाहीत याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अखेर साळी वाड्यातील तरुण, मित्र मंडळी एकत्र येत भाड्याने टेम्पो करून पांजरपोळ येथे पोहोचताच गायीजवळ सोडताच तान्हा, गायीला फुटला पान्हा. गोमाते जवळ आपल्या बछड्याला सोडल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास घेतला.

साळीवाड्यातील तरुण मित्र मंडळी मंगेश पाथरकर, राहुल तुपसाखरे, अनिकेत चांगटे, सार्थक अरगडे, मुकेश नरवडे, अविनाश शहा, हृषीकेश पाथरकर आदि तरूणांनी यामध्ये मोलाची भूमिका निभावली आहे. नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या अर्धवट कारवाईने साळीवाड्यातील तरुणाईला दया आली. प्राणीमात्रांची काळजी घ्या, भूतदया दाखवा. असा संदेश त्यांनी या कार्यातून दिला. परंतु पालिका आरोग्य विभागाचे यामध्ये दुर्लक्ष झाल्याने नागरिकच दक्ष ठरल्याचे दिसून आले.

----- Advertisements -----

शेवटी ही तरूण मित्र एकत्रित केलेल्या प्रयत्नाने हांबरून, हांबरून हतबल झालेल्या गायीने बछड्याला चाटल्या बाबतचा व्हिडिओ यामध्ये आपणास पहावयास मिळणार आहे. बेफिकीर झालेले पालिका कर्मचारी प्राणी यांच्याविषयी कधी भूतदया दाखवणार ? असा सवाल येथील नागरिक आता करू लागले आहेत.

कंत्राटी पध्दतीने चालणारा पालिकेचा कारभार बनला ढिसाळ ?                                             संगमनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून भटके जनावराने कुत्र्यांची धरपकड करून या जनावरांना पांजरपोळ गोशाळेत जमा केल्या जाते. परंतु पालिकेच्या आरोग्य विभागा कडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी याबाबत तीव्र रोष व्यक्त केल्याचे घटनेतून प्रतीत होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुस्त झालेल्या आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याचे जाणवत आहे. तर दुसरीकडे कंत्राटी पध्दतीने नगरपालिकेचा  कारभारच ढिसाळ बनत आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगरपालिका आरोग्य विभागाचे कामात लक्षच नसून हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. विभागातील कर्मचारी फोन तर घेतच नाहीत. संपर्कही करीत नाही. संगमनेरकर नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

 

 

----- Advertisements -----

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर