ब्रेकिंग न्यूज :
भारत

पाइपलाइनच्या कारणावरून एकावर प्राणघातक हल्ला ;

Blog Image
एकूण दृश्ये: 797

पाइपलाइवरून एकावर प्राणघातक हल्ला ; सहा आरोपी अटक  न्यायालयाने सुनावली पीसीआर

    संगमनेर { प्रतिनिधी }

शेतात चक्कर मारायला गेलेल्या एका व्यक्तीला शेतातील पाईपलाईनच्या जुन्या वादावरून गावातील सहा जणांनी शिवीगाळ करून काठ्या, लोखंडी गज, धारदार कोयत्याने वार केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील एका शेतात घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    जोर्वे येथे राहणारे दिगंबर भाऊसाहेब काकड हे आपल्या शेतात कामा निमित्त गेले असता बाळासाहेब कारभारी दिघे, सुनिल कारभारी दिघे, पवन संजय दिघे, नानासाहेब कारभारी दिघे, अक्षय नानासाहेब दिघे, संजय कारभारी दिघे यांनी दिगंबर भाऊसाहेब काकड यांच्या उजवा हात व डाव्या पायाच्या पोटऱ्यांवर जबर मारहाण केली यात दिगंबर काकड हे गंभीर जखमी झाले तसेच मोबाईल फोडला असून या मारहाणीत त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. 

----- Advertisements -----

     दिगंबर काकड यांनी रविवार 13 जुलैला मध्यरात्री संगमनेर तालुका पोलीसात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (1), 118(2), 115 (2), 352, 351 (3), 324 (4), 189 (2), 191 (2), 191 (3), 190 प्रमाणे बाळासाहेब कारभारी दिघे, सुनील कारभारी दिघे, पवन संजय दिघे, नानासाहेब कारभारी दिघे, अक्षय नानासाहेब दिघे, संजय कारभारी दिघे वरील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना अटक केली असून सोमवार दि 14 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने पी सी आर सुनावली आहे. पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे करीत आहे.

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात