नदीपात्रात व्यक्ती वाहून गेली ? ३६ तास उलटत आले तरी आढळला नाही. ड्रोनव्दारे शोध घेतात
संगमनेर ;भारत रेघाटे
ड्युटीला जात असताना नदीपात्रात फुले टाकून नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीला निघालेल्या एका व्यक्तिचा नदीपात्रात तोल गेल्याने ते नदीत वाहून गेल्याचे नागरिक आणि घरच्या व्यक्तीचे म्हणणे आहे. तब्बल चोविस तास उलटून गेल्यानंतरही सदर व्यक्ती हाती लागलीच नसल्याने शहरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरातील प्रवरा नदीवर वरील संगमनेर खुर्द कडे जाणाऱ्या छोट्या पुलावर मंगळवार दि. 26 रोजी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली . या घटनेत विजय संभाजी कुटे वय 40 हे नेहमीप्रमाणे सिद्धकला हॉस्पिटल मध्ये कामास निघाले होते. तत्पूर्वी ते नदीमध्ये फुले टाकून पुढे जाणार होते. परंतु नदीत तोल गेल्याने त्यांचा घरच्यांनी शोध घेऊनही अद्याप ते सापडले अथवा कोणाच्या हाती लागले नाही.

विजय कुटे हे सिध्दकला हॉस्पिटल येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. घरात आई ,वडील, पत्नी योगीता, मुलगा मुकुंद , मुलगी दुर्वा हे राहतात. हलाखीची परिस्थिती आहे. विजय कुटे यांच्यावर बितलेल्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंब आणि संगमनेर शहर शोकाकुल झाले. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान ड्युटीवर जाण्याच्या उद्देशाने विजय यांनी ब्लॅक पॅन्ट निळा शर्ट घातलेला होता. त्या़चा नदीत तोल गेल्याने ते वाहून गेले. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तब्बल चोवीस तास उलटूनही त्यांचा शोध घेवुनही ते सापडलेच नाहीत. ड्रोनव्दारे तपास केला जात आहे.

आमदार खातात यांनी घेतली भेट
विजय कुटे यांना पोहता येत होते. परंतु ,पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते नेमके कोणत्या भागात असतील हे सांगणे तूर्तास तरी शक्य नाही. आमदार अमोल खताळ यांनी विजय कुटे यांच्या कुटुंबाची भेट घेत घटनास्थळीही भेट दिली. तसेच ड्रोनव्लारे व्यक्तीचा शोध घेत पाण्याचा प्रवाहही कमी करण्याचे आदेशच खताळ यांनी दिले.
यावेळी नागरिकांनी पुलास कठडे नसल्याचे तसेच रस्त्यावर खड्डे पडल्याचेही निदर्शनास आणून दिले. याबाबत आमदार खताळ म्हणाले की, यापूर्वीच पाठपुरावा सुरू केला असून लवकरच या समस्येचे निराकरण होईल. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह कमी करण्याचे आदेश देऊन सदर व्यक्तीचा शोध ड्रोनमार्फत घेत असल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले. शोध मोहिमेमध्ये रात्री व्यतय आल्यास शोध मोहीम थांबवून सदर व्यक्तीचा सकाळी शोध घेतला जाईल. यावेळी तहसीलदार धीरज मांजरे, पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, शहर पोलीस निरीक्षक राहुल देशमुख सह पोलीस पथक हजर होते.

