ब्रेकिंग न्यूज :
भारत

नदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ; शोध लागेना

Blog Image
एकूण दृश्ये: 464

नदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ; शोध लागेना 

    संगमनेर :

प्रवरा नदीपात्रामध्ये एका पुरुष जातीचा मृतदेह मिळून आल्याने संगमनेर शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास सदर व्यक्तीचा मृतदेह प्रवरा नदी पात्रातील गंगामाई घाट परिसरात पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत सखोल माहितीचा शोध शोध घेत आहेत.

मंगळवार दिनांक 26 ऑगस्टला विजय कुटे हे नदीपात्रात वाहून गेल्या नंतर तब्बल 60 तासाने विजय कुटे यांचा मृतदेह आढळून आला. आता या घटनेला वीस दिवस होत नाही, तोच प्रवरा नदी पात्रात गंगामाई घाट येते एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना येथील काही नागरिकांना दिसून आला. याबाबत पोलिसांना कळवताक्षणीच तात्काळ शहर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत डेड बॉडी ताब्यात घेत त्यांनी पोस्टमार्टम करता ग्रामीण रुग्णालयात येथे घेऊन सदर व्यक्तीचा शोध घेत असल्याचे शहर पोलीस बी बी गांजवे यांनी सांगितले.

----- Advertisements -----

सदर मयत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्ष असून नाव, गाव, व पत्ता याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलीस शोध पथकाला आढळून आली नाही.

सदर व्यक्तीच्या अंगात लाल, निळसर बारीक लाईन असलेल्या छोट्या चौकटचा फुल शर्ट , काळ्या रंगाची फुल पॅंट , तसेच काळ्या रंगाची अंडरवेअर असून मजबूत बांधा , रंगाने सावळा आणि डोक्याची केस काळसर अशी या व्यक्तीची माहिती असून अशा  स्वरूपाची व्यक्ती बाबत  ज्ञात माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

शहर पोलीसात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 104/2025 BNSS कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली. या बेवारस मयत व्यक्ती बाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी संगमनेर शहर पोलीस फोन नं. 02425/ 225333 किंवा पोहेकॉ योगेश हासे मोनं. 9309983906 पोहेकाॅ भरत गांजवे 9922442361 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin