ब्रेकिंग न्यूज :
भारत

नाशिक पुणे रेल्वे मार्गामुळे सुवर्ण त्रिकोणाच्या विकासात पाडणार भर ; रेल्वेमंत्र्यांना दिले स्मरणपत्र ; पाच जिल्हयांच्या विकासासाठी कटिबद्ध :- आमदार सत्यजीत तांबे

Blog Image
एकूण दृश्ये: 286

नाशिक पुणे रेल्वे मार्गामुळे सुवर्ण त्रिकोणाच्या विकासात पाडणार भर ; रेल्वेमंत्र्यांना दिले स्मरणपत्र ; पाच जिल्हयांच्या विकासासाठी कटिबद्ध :- आमदार सत्यजीत तांबे

    संगमनेर  :भारत रेघाटे

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा महाराष्ट्राच्या प्रादेशिक तसेच राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा उपक्रम आहे. या प्रकल्पाचा मूळ मंजूर मार्ग कायम ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्मरणपत्र दिले आहे. 

        तांबे यांनी स्पष्ट केले की, मूळ मार्गानुसार नाशिक – पुणे या दरम्यान सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव व राजगुरुनगर अशा भागातून जातो. या सर्व भागांना औद्योगिक व आर्थिक विकासाची संधी मिळावी यासाठीच मूळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. परंतु सध्या प्रकल्पाचा मार्ग शिर्डीकडे वळविण्याचा विचार सुरू असून त्यामुळे हा भाग वंचित राहील. तसेच मूळ मार्गासाठी सुमारे २५ ते ३० टक्के जमीन संपादन पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मार्ग बदलल्यास मोठा विलंब होईल तसेच स्थानिक शेतकरी व नागरिकांचा देखील प्रचंड विरोध वाढेल. या दूरदृष्टीने रेल्वे मंत्रालयाने निर्णय घ्यावेत.

     दि. ९ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीतही हा विषय मांडण्यात आला होता असे पत्रात नमूद करून तांबे यांनी केंद्र सरकारला मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा व प्रकल्प ‘महा रेल’ मार्फत तातडीने राबवावा अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना, शहरी गर्दी कमी होणे व संतुलित प्रादेशिक विकास साधता येईल असा ठाम विश्वासही आमदार तांबे यांनी व्यक्त केला.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना  22/8/2025 सविस्तर पत्र देत मूळ मार्गावरच प्रकल्प राबवावा असा आग्रह धरला आहे.

----- Advertisements -----

विकासाचे विषय आणि मुद्यांवर आपण ठाम राहणार : रेल्वे संगमनेर वरून जाण्यासाठी ठाम राहणार ; आमदार तांबे

    माझ्या मतदारसंघातून रेल्वे जाण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत असून त्या त्या भागातील विकासाच्या विषयावर आणि मुद्यांवर आपण कायम ठाम राहणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. केवळ एकाच मतदार संघाची जबाबदारी नव्हे तर नाशिक, धुळे, अहिल्यानगर, नंदुरबार, जळगाव या पाचही जिल्ह्यातील पदवीधर मतदार संघाची आमदारकी सांभाळत असताना त्या त्या भागातील स्थानिक कामा बरोबर तेथील समस्या, विकास कामे, बेरोजगारीला आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. आणि भविष्यात ती कामे कायम स्वरुपी मार्गी लावणार आहोत. दळणवळणाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि बेरोजगारीचे प्रश्न सुटण्यास मदत होत असते. यासाठी प्राधान्याने व सातत्याने पुढाकार घेऊन येथील विकास कामे करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे तांबे यांनी सांगितले.                   गेली अनेक वर्षापासून नाशिक पुणे रेल्वे महामार्गाचा प्रश्न प्रलंबित राहून तसाच खितपत पडला होता. परंतु रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेला पत्र व्यवहार आणि भेटीतून या कामास लवकरच गती मिळणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे जाळे पसरले आहे. शिर्डी, मनमाड, नाशिक, तसेच शिर्डी ,नगर, पुणे हा मार्ग आहेच याशिवाय पुणे, तळेगाव, लोणावळा, मुंबई नाशिक हा मार्ग असल्याने गेली अनेक वर्षापासून नाशिक व्हाया संगमनेर पुणे हा रेल्वे मार्ग होण्यासाठी मी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न केले आणि करीत आहे. तसेच नागरिकांच्या अस्मितेचा प्रश्न आणि मागणी या अनुषंगाने नाशिक पुणे रेल्वेमार्ग संगमनेर, आळेफाटा , नारायणगाव, राजगुरुनगर असाच होणे क्रमप्राप्त आहे. नाशिक, पुणे, मुंबई या सुवर्ण त्रिकोणातील असलेला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून सिन्नर, संगमनेर, खेड, नारायणगाव सह या भागातील विकास साधला जाणार असल्याचे तांबे म्हणाले

 

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम