ब्रेकिंग न्यूज :
भारत

निळवंडे धरणामुळे सुजलाम सुफलाम बनला परिसर डॉ .तांबे

Blog Image
एकूण दृश्ये: 76

निळवंडे धरणामुळे सुजलाम सुफलाम बनला परिसर डॉ .तांबे 

अमृतवाहिनी प्रवरामाईसह म्हाळुंगी नदीचे विधिवत पूजन ; साडी खण नारळाची ओटी देत जलस्रोताची केली आरती ; नदीत केले दीपदान ;

आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह संगमनेरकर व साईनगरीचा लोटला जनसागर 

      संगमनेर { भारत रेघाटे }

लाखो लोकांची जीवनदायीनी ठरलेल्या अमृतवाहिनी प्रवरा माई आणि म्हाळुंगी या नद्यांची साडी खण नारळाने ओटी भरत, दुथडी वाहणाऱ्या अथांग अशा अमृतवाहिणी जलस्तोत्राची महाआरती करत दीपदान देत या परिसराला सुजलाम सुफलाम केल्याबद्दल तिचे आभार व्यक्त केले. लाखो लोकाची जीवनदायिनी ठरलेल्या प्रवरा म्हाळुंगीचे पूजन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच काँग्रेसच्या युवा अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात डॉ. मैथिली तांबे यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी माजी नगरसेवक तसेच संगमनेरकर आणि साईनगरीच्या हजारोंच्या उपस्थितीमध्ये अमृतवाहिनी प्रवरामाईचे पूजन करण्यात आले.

गेली दोन महिने सतत बरसत राहणाऱ्या जलधारामुळे अमृतवाहिनी असलेल्या प्रवरामाई, म्हाळुंगी या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. निळवंडे धरणाच्या माध्यमातून अनमोल पाण्याचा स्त्रोत उभे करण्याचे महान कार्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून झाले .निळवंडे धरण उभे राहिले आहे. आज लाखो लोकांचे जीवन या जीवनदायींनीवर अवलंबून असल्याने पाण्याचा भरपूर स्त्रोत मिळत आहे. समाजाबरोबर या निसर्गाच्या आणि पंचतत्त्वाचे आपण देणे लागतो. हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून आपण ऋणनिर्देश केला पाहिजे आभार व्यक्त केले पाहिजे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

----- Advertisements -----

चांगल्या कामाचे आपण कौतूक केले पाहिजे. अमृतवाहिनी प्रवरामाई आणि म्हाळुंगीचे जलपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे. हा आनंदच द्विगुणीत करणारा आहे. प्रवरा नदीमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील लाखों नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे.भारतीय संस्कृतीत नदीला अत्यंत पवित्र स्थान आहे. नदीला आई म्हटलेले आहे.यावर्षी सुरुवातीलाच पाऊस चांगला झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाबरोबर प्रवरा नदीवर निळवंडे येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठ्या प्रयत्नातून निळवंडे धरण पूर्ण केले. दोन्ही बाजूला कालवे निर्माण केले. नदीतून आणि कालव्यातून पाणी येत असल्याने आता समृद्धी वाढली आहे. निळवंडे व भंडारदरा मिळून आता 20 टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाला हा परिसर सुजलाम सुफलाम झाला.

काँग्रेसच्या युवा अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, जशी नदी सर्वांना सामावून घेते तसा हा संगम आपल्या संगमनेर मध्ये पहावयास मिळतो. या ठिकाणी सर्वसामान्य माणसापासून , सर्व जाती- धर्म ,पंथ यांना एकत्रित घेवून आपण गुण्यागोविंदाने राहतो. रतनवाडी येथील अमृतेश्वर पासून उगम पावणारी आपली प्रवरा नदी ही पुढे मोठी होत जाऊन समुद्राला मिळते. पाच नद्यांच्या संगमामुळे संगमनेर शहराला संगमनेर हे नाव मिळाले आहे. संगमनेरची एक सुसंस्कृत संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. प्रत्येक विभागाची संस्कृती घेऊन प्रवरा नदी समुद्राशी एकरूप होते. संगमनेरची ही संस्कृती एकतेची समानतेची आहे. आई म्हणून नदीची ओळख असून मोठ्या आनंदाने दरवर्षी आपण तिचे पूजन करत असतो.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, गणेश मादास, अंबादास आडेप, लक्ष्मण बर्गे, ॲड अजित काकडे, प्रमिला अभंग, ॲड मुन्ना कडलक, चंद्रकांत कडलक, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, सुमित पवार,आदित्य बर्गे,चंद्रकांत काळन, एकनाथ श्रीपत, प्रीती फटांगरे,मिलिंद आवटी, तसेच अनिता कानवडे, अंजली बेल्हेकर, संगीता सातपुत, दगाबाई धात्रक, उषा शाह, संगीता थोरात, मीना पटेल, वैशाली आडेप, नम्रता आडेप, कांचन गुप्ता, सुनीता कांदळकर, सुषमा भालेराव, सौदामिनी कान्होरे,अन्नपूर्णा पवार, माया भालेराव, वैष्णवी आडेप,शितल कानवडे, सुमन वामने, बेबीताई मांजरे, कांचन घोडेकर, मीना घोडेकर, वैशाली घोडेकर, यांच्यासह साईनगर घोडेकर मळा चव्हाण पुरा लाल तारा काटे मळा माधव टॉकीज रंगार गल्ली कॉलनी परिसरातील महिला संगमनेर मधील विविध पक्षांचे कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----- Advertisements -----

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी